Maharashtra Government: शिवाजी पार्कात शपथविधी सोहळा घेण्याची प्रथा पाडू नका; उच्च न्यायालयाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:52 PM2019-11-27T15:52:45+5:302019-11-27T15:56:54+5:30
Maharashtra News: उद्या संध्याकाळी ६. ४० वाजता दादर येथील शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
मुंबई - २०१० साली मुंबई हायकोर्टात शिवाजी पार्कसंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान शिवाजी पार्क येथे उद्या होणारा महाविकासआघाडी सरकारचा शपथविधी सोहळ्यामुळे सुरक्षेची चिंता हायकोर्टाने व्यक्त केली आहे. तसेच हायकोर्ट हा शपथविधी सोहळा थांबवू शकत नाही. मात्र, संबंधित यंत्रणांना सुरक्षेची खातरजमा करण्यास सांगू शकते. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री शपथविधी सोहळा शिवाजी पार्कात घेण्याची प्रथा बनवू नका असा सल्ला देखील हायकोर्टाने दिला आहे.
न्या. एस. सी. धर्माधिकारी आणि न्या. आर. आई. छागला यांच्या खंडपीठाने आज सुनावणीदरम्यान हा सल्ला दिला. तसेच खंडपीठाने अजूनही काहीजण मैदानाचा अशा प्रकारे मैदानाचा वापर करण्यास मागणी करू शकतात असे खंडपीठाने नमूद केले. वेकॉम ट्रस्टने ही याचिका २०१० साली हायकोर्टात दाखल केली होती. शिवाजी पार्कात होणारे भव्य कार्यक्रमांमुळे शांतता भंग होते. त्यामुळे शिवाजी पार्क हे ‘शांतता क्षेत्र’ असल्याने याठिकाणी लाऊडस्पीकरचा वापर करता येत नसल्याचे सांगत ‘वेकॉम ट्रस्ट’ने मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर अखेर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आले आहे. नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून उद्या संध्याकाळी ६. ४० वाजता दादर येथील शिवाजी पार्कात उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
Uddhav Thackeray, Shiv Sena chief and the leader of 'Maha Vikas Aghadi' will take oath as the Chief Minister of #Maharashtra tomorrow, the swearing-in ceremony will be held at Shivaji Park in Mumbai. https://t.co/4Yd0pFUDyd
— ANI (@ANI) November 27, 2019