विधान परिषद निवडणुकीचा शंखनाद

By Admin | Published: October 21, 2016 12:36 AM2016-10-21T00:36:10+5:302016-10-21T00:36:10+5:30

मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे ज्या विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष लागून होते,

Legislative council elections | विधान परिषद निवडणुकीचा शंखनाद

विधान परिषद निवडणुकीचा शंखनाद

googlenewsNext

भंडारा : मागील सहा महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेतील सदस्यांचे ज्या विधान परिषद निवडणुकीकडे लक्ष लागून होते, त्या विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम बुधवारला घोषित झाला. सोमवारला नगर परिषद निवडणुका घोषित झाल्यामुळे विधान परिषद निवडणूक लांबणीवर पडणार होत्या, अशा चर्चांना आता विराम मिळाला आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबरला मतदान होणार असून या निवडणुकीच्या घोषणेमुळे आता संपूर्ण भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
आमदार राजेंद्र जैन हे विधान परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजप आणि काँग्रेस पक्षाकडून स्वतंत्र उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. ५ डिसेंबर रोजी राज्यातील सहा विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यामुळे या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. यापूर्वी डिसेंबर २०१० मध्ये निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मतदारांची संख्या कमी होती. यावेळी नगरपंचायत सदस्यांना विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळाल्यामुळे ही संख्या वाढली आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदारसंघात भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि भंडारा, तुमसर, पवनी, गोंदिया, तिरोडा नगर परिषद सदस्य आणि पंचायत समितींचे सभापती यांचे मतदान होते. त्यामुळे मतदार संख्या ३१९ होती.
यावेळी २०१६ मध्ये भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, लाखनी, लाखांदूर तर गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, मोरगावअर्जुनी, सडकअर्जुनी, देवरी नगर पंचायती अस्तित्वाल आले. या १७ सदस्यीय नगर पंचायतीमध्ये दोन स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे यावेळी मतदार संख्या ३९५ झाली आहे. गोंदिया जिल्हा परिषदेतील दोन सदस्य अपात्र ठरल्यामुळे मतदार संख्या ३९३ ईतकी राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Legislative council elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.