अजित पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 01:48 PM2023-07-02T13:48:33+5:302023-07-02T13:49:03+5:30

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे.

Meeting of NCP leaders at Ajit Pawar's house, Sharad Pawar's first reaction | अजित पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

अजित पवारांच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक, शरद पवारांची पहिली प्रतिक्रीया

googlenewsNext

मुंबई- विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज राष्ट्रवादीच्या काही आमदारांसह पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. ही बैठक पक्षातील प्रदेशाध्यक्ष पदासाठी असल्याचे बोलले जात आहे. आता या बैठकी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

शरद पवार म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांना लोकप्रतिनिधींच्या बैठका घेण्याचा अधिकार आहे. या संदर्भातच काहीतरी बैठक असावी. मला या बैठकी संदर्भात काही माहिती नाही, अशी प्रतिक्रीया खासदार अजित पवार यांनी दिली.

भाकरी फिरवणार! NCPचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? अजित पवारांच्या घरी खलबते, समर्थक आमदार पोहोचले

NCPचा प्रदेशाध्यक्ष बदलणार?

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्याला पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पद देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.  राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे बैठकीसाठी पोहोचल्याची माहिती देण्यात आली असून, अजित पवारांच्या उपस्थितीत  बैठक होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे आमदार, जिल्हाध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ, खासदार अमोल कोल्हे अजितदादांच्या घरी पोहोचले आहेत. यासह अजित पवार यांच्या बंगल्यावर त्यांच्या समर्थक आमदारांनी हजेरी लावली आहे. 

Web Title: Meeting of NCP leaders at Ajit Pawar's house, Sharad Pawar's first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.