राहुल गांधींनाही अयोध्येला नेणार का उद्धव ठाकरे?; संजय राऊत घुश्श्यात म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 03:30 PM2020-01-25T15:30:38+5:302020-01-25T15:45:32+5:30
शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येच्या दौऱ्यावर जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांचा 24 नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला हा अयोध्या दौरा लांबणीवर पडला होता. मात्र आज शिवेसेनेचे नेते संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आगामी 7 मार्चला अयोध्येत जाणार असल्याचे सांगत या दौऱ्याचं कोणाही राजकारण करु नये असं आवाहन देखील केले आहे. तसेच उद्धव ठाकरे अयोध्येत रामलल्लाचं दर्शन घेतील, शरयू तीरावर आरती करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातील हजारो शिवसैनिक देखील अयोध्येला जाणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.
Sanjay Raut, Shiv Sena: Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray will visit Ayodhya (Uttar Pradesh) on 7th March. pic.twitter.com/v7wHTHJM27
— ANI (@ANI) January 25, 2020
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 25, 2020
चलो अयोध्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'या' दिवशी घेणार रामलल्लाचं दर्शन
संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनाही सोबत घेऊन जाणार का असा सवाल विचारण्यात आला होता. यावर अयोध्येत राम मंदिर उभारण्याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी या निर्णयाचे स्वागत केले होते असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे, प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतील तेव्हा काय उत्तर द्याल?; मनसेचे चोख प्रत्युत्तर
महाविका आघाडीच्या सर्व नेत्यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यासोबत अयोध्येत यावं अशी इच्छा असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राहुल गांधींना आयोध्येत नेण्याबाबतच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्षाने ज्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासोबत जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले होते, त्या मेहबूबा मुफ्तींना आयोध्या दौऱ्याच्या वेळी सोबत नेणार का, असा सवालही राऊत यांनी उपस्थित केला आहे.