निधी गेला कुठे? राष्ट्रवादीच्या विरोधातील आमदारांनाही भरघोस निधी

By दीपक भातुसे | Published: July 25, 2023 05:56 AM2023-07-25T05:56:14+5:302023-07-25T05:57:16+5:30

ठाकरे गट, काँग्रेस आमदारांची निराशा

Where did the funds go? MLAs who are opposed to the NCP are also heavily funded | निधी गेला कुठे? राष्ट्रवादीच्या विरोधातील आमदारांनाही भरघोस निधी

निधी गेला कुठे? राष्ट्रवादीच्या विरोधातील आमदारांनाही भरघोस निधी

googlenewsNext

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्याच्या अर्थमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतलेल्या अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मांडलेल्या पुरवणी मागण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील आमदारांच्या मतदारसंघांमध्ये कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. भाजपचे गंगापूर विधानसभेचे आमदार प्रशांत बब यांना सर्वाधिक ७४२ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे समोर आले आहे. मात्र, विरोधक असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या आमदारांच्या वाट्याला निराशा आली आहे. 

जयंत पाटलांच्या मतदारसंघासाठी ५८० कोटी रुपये

विशेष म्हणजे अजित पवार यांचे ज्यांच्याबरोबर पक्षात असतानाही पटले नाही अशा जयंत पाटील यांच्या वाळवा या मतदारसंघात तब्बल ५८० कोटी ३१ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच, सत्ताधारी भाजप, शिंदे गटाच्या आमदारांनाही भरघोस निधी देण्यात आलेला आहे.  

राष्ट्रवादी (शरद पवार गट)

जयंत पाटील, वाळवा     ५८० कोटी 
राजेश टोपे, घनसावंगी     २९३ कोटी
रोहित पवार, कर्जत-जामखेड     २१० कोटी
संदीप क्षीरसागर, बीड    ३५ कोटी

राष्ट्रवादी (अजित पवार गट)

दत्ता भरणे, इंदापूर     ४३६ कोटी
मकरंद पाटील, वाई-खंडाळा-महाबळेश्वर    २९१ कोटी
किरण लहामटे, अकोले    ११६ कोटी
दिलीप वळसे-पाटील, आंबेगाव     ९६ कोटी
अजित पवार, बारामती    ७३ कोटी
अदिती तटकरे, श्रीवर्धन     ४० कोटी
माणिकराव कोकाटे, सिन्नर     ३३ कोटी
छगन भुजबळ, येवला    ३१ कोटी
हसन मुश्रीफ, कागल    २२ कोटी
धनंजय मुंडे, परळी    २१ कोटी
प्रकाश साळुंखे, गेवराई    १३ कोटी

शिंदे गट

अब्दुल सत्तार, सिल्लोड     ५८ कोटी
भरत गोगावले, महाड     १३४ कोटी
महेंद्र दळवी, अलिबाग     ४५ कोटी
महेंद्र थोरवे, कर्जत     ४८ कोटी
संदीपान भुमरे, पैठण     २९ कोटी
संतोष बांगर, कळमनुरी     १९ कोटी

भाजप

प्रशांत बब, गंगापूर    ७४२ कोटी
महेश बालदी, उरण     २८ कोटी

माकप

विनोद निकोले, डहाणू     ७६ कोटी
काँग्रेसच्या १५ आमदारांना शून्य निधी

निधी वाटपात काँग्रेसच्या १५ आमदारांना एक रुपयाही देण्यात आलेला नाही, तर २० आमदारांना केवळ १ ते ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील आमदारांच्या तोंडालाही निधी वाटपात पाने पुसण्यात आली आहेत.

Web Title: Where did the funds go? MLAs who are opposed to the NCP are also heavily funded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.