एका शिस्तबद्ध गुंतवणूकदाराच्या इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल मोलाच्या सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 03:54 PM2020-10-12T15:54:06+5:302020-10-12T15:57:07+5:30

Equity Mutual Funds: शिस्तबद्ध गुंतवणूक समजून घेणे खूपच सरळसोट आहे. मात्र तिचं पालन करणं अतिशय आव्हानात्मक आहे.

Instructions on equity mutual funds from disciplined investor | एका शिस्तबद्ध गुंतवणूकदाराच्या इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल मोलाच्या सूचना 

एका शिस्तबद्ध गुंतवणूकदाराच्या इक्विटी म्युच्युअल फंडांबद्दल मोलाच्या सूचना 

Next

गुंतवणुकीत शिस्त आणणे सोपे नाही. हेतू चांगले असूनही आपण अनेकदा निकृष्ट दर्जाचे गुंतवणूक निर्णय करतो. बाजारातील हालचाली आणि लघुकालीन प्राप्ती यांमुळे आपले निर्णय झाकोळले जातात. आपण बाजाराला भावनिक स्तरावर प्रतिक्रिया देतो. म्हणूनच आपल्याला अनावश्यक नुकसान आणि भरभक्कम व्यवहार खर्च सोसावे लागतात. आता तुमच्याकडे दीर्घकालीन गुंतवणूक योजना नीट विचार करून ठरवलेली असेलही. मात्र, बहुतेकदा त्याचे पालन केले जात नाही.

का?

आम्ही आज तुमच्याशी नेमक्या याच मुद्दयावर बोलणार आहोत.

याबद्दल विचार करा.

गुंतवणुकीतील सगळे तज्ज्ञ आपल्याला सांगतात की, इक्विटी मार्केट्समधून संपदा संचय हा सर्वोत्तम मार्ग आहे.

फक्त सुरुवात लवकर करा...

आणि मग, तुम्ही करू शकाल तेवढी गुंतवणूक करा.

तुम्ही हे केले तर, काही काळात मोठ्या संपत्तीचा संचय करण्याच्या तुमच्या संधी जास्तीत-जास्त असतील.

शिस्तबद्ध गुंतवणूक समजून घेणे खूपच सरळसोट आहे. आणि तरीही पालन करण्यासाठी ही सर्वांत कठीण बाबींपैकी एक ठरू शकते.

आज आम्ही इक्विटी म्युच्युअल फंडातील शिस्तबद्ध गुंतवणुकीसाठीचे आमचे सर्वोत्तम नियम तुमच्यापुढे ठेवत आहोत. तुम्हाला हवी तेवढी संपत्ती जमा करण्यात ते नियम उपयुक्त ठरू शकतील...

१. दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्टे निश्चित करा

तुम्ही गुंतवणूक का करत आहात? तुम्हाला तुमचे पैसे सहा महिन्यांत, एक वर्षात, पाच वर्षांत की त्याहून अधिक काळात परत हवे आहेत? तुम्ही निवृत्तीसाठी बचत करत आहात की नवीन घर खरेदी करण्यासाठी?

एकदा तुमची उद्दिष्टे निश्चित झाली की, तुम्हाला किती मुद्दल लागणार आहे याचा अंदाज बांधणे सोपे होते. इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीवर कोणत्या प्रकारचा मोबदला तुम्हाला हवा आहे याचा विचार करा. येथे आम्ही काही वापरण्यास सोपे असे उद्दिष्ट नियोजक तयार केले आहेत. त्यावरून तुम्ही सुरुवात करू शकता- an easy to use goal planner 

इक्विटीजमध्ये संपदा संचय दीर्घकाळानंतर होतो. तुम्हाला तुमचा पैसा सहा महिने किंवा त्याहून कमी काळात परत हवा असेल तर लघुकालीन गुंतवणूक पर्यायांचा विचार करा. लिक्विड फंड्स ही उत्तम लघुकालीन उत्पादने आहेत.

तुमच्या प्रारंभिक गुंतवणुका दीर्घ काळात एकत्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवा. यामुळे इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे पूर्ण फायदे उचलता येतील. लघुकालीन प्राप्ती आकर्षक वाटू शकते. मात्र, दीर्घकालीन मोठ्या प्राप्तीसाठी संयम बाळगण्याचा सल्ला आम्ही तरी देतो!

२. सध्या तुमचा जोखीम सहन करण्याचा स्तर कोणता आहे? 

तुमचा विविध गुंतवणुकींशी परिचय जसजसा वाढत जाईल, तसतशी तुमची गुंतवणुकींशी निगडित जोखमींची समजही सुधारत जाईल. तुम्हाला पूर्वी बरीच जोखमीची वाटलेली एखादी गुंतवणूक प्रत्यक्षात तेवढी जोखमीची नाही हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मग कदाचित या गुंतवणुकीत आणखी वाढ करण्यास तयार व्हाल.

आकलनाची संकल्पना गुंतवणुकीत महत्त्वाची आहे. आकलन कालांतराने बदलू शकते. बुल मार्केटमध्ये इक्विटी गुंतवणुका कमी जोखमीच्या वाटतात. बेअर मार्केटमध्ये त्या अधिक जोखमीच्या वाटतात. तुम्ही भावनेच्या भरात वाहत गेलात, तर संकटात सापडू शकता.

स्वत:ला चांगले समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.

तेव्हा, सध्या तुमचा जोखीम सहन करण्याचा कोणता स्तर आहे?

या प्रश्नाला तुम्ही काय उत्तर देता यावरून तुमच्या प्रोफाइलशी जुळणा-या योजनांचा विचार करता येईल.

तुमच्या गुंतवणुका जोखीम सहन करण्याच्या ताकदीशी जुळवून बघण्याचा हा एक सुलभ मार्ग आहे...

उदाहरणार्थ, गुंतवणुकीत २० टक्के तात्पुरती घसरण तुम्हाला अस्वस्थ करून सोडणार असेल तर तुम्ही इक्विटी गुंतवणुकींपासून दूरच राहिलेले बरे, कारण या प्रकारात अशा घसरणी नेहमीच्या आहेत.

याउलट जर तुमच्याकडे पुढील १० वर्षे किंवा अशा कालावधीसाठी अतिरिक्त पैसा असेल, तर इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये नक्की गुंतवणूक करा.

३. तुम्हाला अनुकूल असे असेट वितरण धोरण निवडा: 

वैयक्तिक दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर आधारित चतुर असेट वितरण धोरण निवडा. बाजारातील चढउतारांना त्वरित प्रतिसाद देण्याऐवजी या वितरणाला दीर्घकाळ चिकटून राहा. यामुळे तुम्हाला गुंतवणुकीवर उत्तम मोबदला प्राप्त करण्यात मदत होईल.

उदाहरणार्थ, जर तुमची मध्यम जोखमीची प्रोफाइल असेल, तर मल्टि-असेट फंडात गुंतवणुकीचा विचार करा. या फंडामध्ये इक्विटी, डेट आणि गोल्ड यांच्यात समतोल साधलेला असतो. तुमच्या जोखीम पत्करण्याच्या क्षमतेसाठी हा उत्तम पर्याय आहे.

तुम्ही निवडलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानचा (एसआयपी) अवलंब करणे हा शिस्तबद्ध तसेच धोरणाला चिकटून राहण्याचा उत्तम मार्ग आहे.

४. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका

इक्विटी म्युच्युअल फंड्स अनेकदा आपल्या अपेक्षांच्या विरुद्ध हालचाली करतात आणि त्यातून असुरक्षितता निर्माण होते. मी नुकसान टाळण्यासाठी आत्ताच विक्री करावी का? दर पुन्हा उसळी कधी घेतात याची वाट बघत शांत बसावे का? या विचारांनी अत्यंत शिस्तबद्ध गुंतवणूकदारही विचलित होऊ शकतात.

बाजारातील चढउतारांमुळे तुमचे असेट वितरण बदलण्याचा मोह टाळा. तुमच्या दीर्घकालीन गरजांसाठी स्वत:चा पोर्टफोलिओ तयार करा आणि तो याच हेतूने कायम ठेवा. आज बाजारात काय होत आहे याचा विचार न करता दीर्घकाळासाठी पोर्टफोलिओ उभारा. असे केल्यास गुंतवणुकीला इच्छित ध्येय साध्य करण्याची उत्तम संधी मिळते.

इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे कठीण मुळीच नाही. ही तुमच्या अन्य कोणत्याही यशस्वी प्रयत्नासारखीच आहे. पुरेसा वेळ द्या, प्रयत्न करा आणि शिस्त राखा. मग बघा तुमची संपदा कशी वाढते ते.

पुढील पायरी: तुमचे मोफत साधन वापरून आखा स्वत:ची कस्टमाइझ्ड असेट वितरण योजना- your own customized asset allocation plan.

संपादकीय टिपण: आमचे संस्थापक अजित दयाल हे काळाच्या निकषावर उत्तम ठरलेले असेट वितरण मॉडेल वापरतात. त्यांनी नुकतेच एका व्हिडिओत हे मॉडेल स्पष्ट केले आहे. Watch it HERE (नोंदणीची आवश्यकता नाही). क्वाण्टममध्ये आम्ही गुंतवणूकदारांशी संवाद साधताना हाच दृष्टिकोन ठेवतो. तुम्हाला आमच्याशी बोलायचे असेल, तर तुम्ही CustomerCare@QuantumAMC.com या पत्त्यावर मेल पाठवू शकता. नेहमीप्रमाणेच तुम्हाला मदत करण्यात आम्हाला खूप आनंद वाटेल. 

Web Title: Instructions on equity mutual funds from disciplined investor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.