30+ तरुणांनी म्युच्युअल फंडात कुठे, किती आणि कसे पैसे गुंतवावेत?... जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 11:04 AM2020-04-29T11:04:23+5:302020-04-29T11:06:05+5:30

म्युच्युअल फंडात तिशीनंतर गुंतवणूक करायचा विचार असेल तर तुमची रिस्क प्रोफाइल काय आहे याचा विचार करा.

Mutual Funds: How and where should youngsters invest in mutual funds? | 30+ तरुणांनी म्युच्युअल फंडात कुठे, किती आणि कसे पैसे गुंतवावेत?... जाणून घ्या

30+ तरुणांनी म्युच्युअल फंडात कुठे, किती आणि कसे पैसे गुंतवावेत?... जाणून घ्या

googlenewsNext
ठळक मुद्देफंडात किती वर्षे सतत गुंतवणूक करतोय या प्रश्नाचे उत्तर पॉझिटिव असायला हवं. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सर्व वयोगटासाठी लाभदायक असते. थोडीशी रिस्क घ्यायची तयारी असेल तर 50 ते 60 टक्के गुंतवणूक इक्विटी फंडात करा.

बऱ्याचदा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना ती गुंतवणूक भरपूर केली तर भरपूर रिटर्न्स मिळतील अशा चुकीच्या संकल्पना डोक्यात ठेवल्या जातात. खरं तर फंडात किती वर्षे सतत गुंतवणूक करतोय या प्रश्नाचे उत्तर पॉझिटिव असायला हवं. तिशी उलटलेल्या, कौटुंबिक जबाबदारी असलेल्या लोकांना गुंतवणूक करताना मर्यादा असतात.  त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड कामाला येत नाहीत असा सुद्धा गैरसमज लोकांमध्ये पसरला आहे.

हे खरं नाही!

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सर्व वयोगटासाठी लाभदायक असते. फंडात तिशीनंतर गुंतवणूक करायचा विचार असेल तर तुमची रिस्क प्रोफाइल काय आहे याचा विचार करा. तुमचा हाऊसिंग लोनचा ईएमआय जातो का? तुमच्या घरात किती कुटुंबीय आहेत? त्यांचे सगळे खर्च भागवून तुम्हाला गुंतवणूक करण्यासाठी किती पैसे बाजूला काढता येतात? याचा विचार करा. पती-पत्नी दोघेही कमावणारे असतील तर त्यांची गुंतवणूक करण्याची कपॅसिटी असून सुद्धा खर्चावर ताबा नसल्यामुळे गुंतवणूक होत नाही असेही दिसून येते. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ठरावीक रक्कम बाजूला काढायची सवय लावून घ्या.

STP... मंदीच्या काळातील ही सुवर्णसंधी सोडू नका, नाहीतर पस्तावाल!

शेअर बाजार पडतोय... मग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक थांबवायची का?

गुंतवणूक कुठे करायची?

अर्थातच म्युच्युअल फंड हा एक बेस्ट ऑप्शन आहे. तुमची थोडीशी रिस्क घ्यायची तयारी असेल तर 50 ते 60 टक्के गुंतवणूक इक्विटी फंडात करा.

इक्विटी फंडातील सिलेक्ट फोकस फंड, लार्ज कॅप फंड आणि बॅलन्स फंड असे 3 फंड निवडून त्यात दरमहा एसआयपी सुरू करा आणि उरलेले पैसे फिक्स इन्व्हेस्टमेंट म्हणून बाजूला ठेवा. दहा वर्षानंतर चाळिशी उलटलेली असेल आणि तुमचे पैसे सुद्धा वाढले असतील. यासाठी एक निश्चय हवा! गरज लागली म्हणून मध्येच एसआयपी थांबवायची, असलेले म्युचल फंड विकून टाकायचे असं काही करू नका.

कधी करायची म्युच्युअल फंडात गुंतवणूक?

शेअर बाजार की म्युच्युअल फंड?... कुठे मिळेल हमखास नफा?

जर तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर दरमहा जे पैसे इक्विटी फंडात गुंतवता त्याऐवजी ते पैसे टॅक्स सेविंग म्युच्युअल फंडात गुंतवा म्हणजे म्युच्युअल फंडातील वाढीचा फायदा सुद्धा मिळेल आणि टॅक्स सेव्हिंगसुद्धा करता येईल.

Web Title: Mutual Funds: How and where should youngsters invest in mutual funds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.