नको चिंता, नको भीती; दरमहा फक्त 500 रुपये गुंतवूनही व्हाल लखपती!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 06:28 PM2020-03-17T18:28:25+5:302020-03-17T18:30:28+5:30

Mutual Funds: दरमहा 500 रुपये गुंतवून मिळणार काय?... असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे ''खूप काही''

Mutual Funds: you can invest only 500 rs per month to get good returns | नको चिंता, नको भीती; दरमहा फक्त 500 रुपये गुंतवूनही व्हाल लखपती!

नको चिंता, नको भीती; दरमहा फक्त 500 रुपये गुंतवूनही व्हाल लखपती!

Next
ठळक मुद्देससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. जो हळूहळू जातो तोच शर्यत जिंकतो. भरपूर पैसे नाहीत म्हणून गुंतवणूक करताच येत नाही, असं अजिबातच नाही!

म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायचा निर्णय आता घेतलाय. मग, किती रुपयांपासून सुरुवात करू बरं?... ही शंका तुमच्या मनात आली तर फार त्रास घेऊ नका. कारण, उत्तर एकदम सोप्पं आहे. 

फक्त 500 रुपये! 

काहीही काय? फक्त 500 रुपयांत कुणी म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करू शकतं का? माझ्या एका ओळखीच्या माणसाने तर सांगितलं होतं की, म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे भरपूर भांडवल असायला हवं. शेअर मार्केटमध्ये उतरायचं तर खूप पैसे असायला हवेत. मग, 500 रुपयांत काय होतंय?

CoronaVirus: शेअर बाजार पडतोय... मग म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक थांबवायची का?

शेअर बाजार की म्युच्युअल फंड?... कुठे मिळेल हमखास नफा?

 
तुमच्या मित्राने जे सांगितलं ते चूक नाहीए. भरपूर पैसे असतील तर गुंतवणूक नक्की करता येते. याचा अर्थ भरपूर पैसे नाहीत म्हणून गुंतवणूक करताच येत नाही, असा काढू नका!

दरमहा फक्त 500 रुपये इतकी छोटी रक्कम सुद्धा म्युच्युअल फंडात गुंतवली जाऊ शकते.

आता तुमचा पुढचा प्रश्न असेल, दरमहा 500 रुपये गुंतवून मिळणार काय?... बरोबर ना?

मग, या प्रश्नाचं उत्तर आहे ''खूप काही''

कधी करायची म्युच्युअल फंडात गुंतवणूक?

म्युच्युअल फंड म्हणजे काय?... जाणून घ्या सोप्या शब्दांत

ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. जो हळूहळू जातो तोच शर्यत जिंकतो. आता म्युच्युअल फंड्समध्ये जर तुम्ही दर महिन्याला 500 रुपये गुंतवायला सुरुवात केलीत आणि तुम्ही 15 वर्षांसाठी दरमहा 500 रुपये गुंतवणार आहात. म्हणजेच तुमची गुंतवणूक 15 x 500 x 12 अशी एकूण 90 हजार रुपये होते. 

तुमच्या गुंतवणुकीवर किती व्याजदर मिळेल, तर तो 10 टक्के धरूया. म्युच्युअल फंडात कधीकधी जास्तही मिळतो, पण थोडा सावध पवित्रा घेतला तरी गुंतवलेल्या 90 हजार रुपयांमधून 15 वर्षांनंतर आपल्याला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.   
 

Web Title: Mutual Funds: you can invest only 500 rs per month to get good returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.