मुंबईतील रुग्णसंख्येत पुन्हा घट, राज्यात ६, ७२७ नवीन रुग्णांचे निदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 05:43 AM2021-06-29T05:43:57+5:302021-06-29T05:44:33+5:30
मृतांमध्ये नऊ पुरुष तर नऊ महिला रुग्णांचा समावेश होता. सात मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर १० रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. तर एक मृत ४० वर्षांखालील आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत सोमवारी पुन्हा घट दिसून आली. दिवसभरात ६०८ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण वाढीचा सरासरी दैनंदिन दर मात्र ०.०९ टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधीही आता ७२८ दिवसांवर पोहोचला आहे.
आतापर्यंत मुंबईत सात लाख २० हजार ९६४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी सहा लाख ९४ हजार ७९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच १५ हजार ४१४ रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. सध्या आठ हजार ४५३ सक्रिय रुग्ण आहेत. सोमवारी मृत्युमुखी पडलेल्या १८ रुग्णांपैकी १२ रुग्णांना सहव्याधी होत्या.
मृतांमध्ये नऊ पुरुष तर नऊ महिला रुग्णांचा समावेश होता. सात मृत झालेले रुग्ण ६० वर्षांवरील होते, तर १० रुग्ण ४० ते ६० वर्षांमधील होते. तर एक मृत ४० वर्षांखालील आहेत. दिवसभरात २८ हजार २९५ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत ७० लाख ७२ हजार ९५३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. ९६ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात ६, ७२७ नवीन रुग्णांचे निदान
मुंबई : राज्यात सोमवारी ६ हजार ७२७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, १०१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यू दर २.०१ टक्के इतका आहे. आता राज्यात १ लाख १७ हजार ८७४ सक्रिय रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,१२,०८,३६१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६०,४३,५४८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,१५,८३९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ४,२४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी, तिसऱ्या लाटेची धास्ती सतावत आहे. आज नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. आज १० हजार ८१२ कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली.
आतापर्यंत एकूण ५८ लाख ९२५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९९ टक्के इतके आहे.