स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड सुवर्णसंधी, ‘लोकमत’ व ‘ICICI प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड’ वेबिनारला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:49 AM2020-06-24T00:49:53+5:302020-06-24T00:50:09+5:30

अर्थतज्ज्ञ, एनएसडीएलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन यावेळी लाभले. महाराष्ट्र आणि गोवा येथील हजारो लोकांनी यामध्ये सहभाग घेतला.

Response to Mutual Fund Golden Opportunity for Dream Fulfillment, ‘Lokmat’ and ‘ICICI Prudential Mutual Fund’ webinars | स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड सुवर्णसंधी, ‘लोकमत’ व ‘ICICI प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड’ वेबिनारला प्रतिसाद

स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड सुवर्णसंधी, ‘लोकमत’ व ‘ICICI प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड’ वेबिनारला प्रतिसाद

Next

मुंबई : जीवनामध्ये प्रत्येकजण स्वप्न पाहतो. या स्वप्नपूर्तीसाठी म्युच्युअल फंड सुवर्ण संधी आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार येथे केलेली गुंतवणूक सर्वोत्तम ठरत आहे, असा सूर ‘लोकमत’ व ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सद्य परिस्थितीत आपले वित्त व्यवस्थापन कसे करावे आणि म्युच्युअल फंड’ या विषयावरील स्मार्ट इन्व्हेस्टर या वेबिनारमधून निघाला.
कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. अशा परिस्थितीमध्ये भविष्यातील वित्त व्यवस्थापनासाठी गुंतवणूक करण्याचा अनेकजण विचार करत आहेत. त्यांच्यासाठी हा वेबिनार दिशादर्शक ठरला. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसी स्पीकर गौरव जाजू आणि अर्थतज्ज्ञ, एनएसडीएलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन यावेळी लाभले. महाराष्ट्र आणि गोवा येथील हजारो लोकांनी यामध्ये सहभाग घेतला.
गौरव जाजू म्हणाले, जुन्या पिढीमध्ये लोक धोका नको म्हणून शिल्लक रक्कम ठेवीमध्ये अथवा मालमत्ता खरेदीत गुंतवणूक करत होते. त्यांनी केलेल्या गुंतवणुकीमध्ये फायदा कमी होता. त्यावेळी बचतीला महत्त्व होते. सध्या गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. भारत हा युवकांचा देश असून, ती जमेची बाजू आहे. सध्याच्या पिढीकडे पैसा आहे. मात्र, त्यांचा पैसा चैनीच्या वस्तू खरेदीसाठी खर्च होत आहे. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यास शिल्लक रकमेच्या योग्य नियोजनाबरोबर परतावाही चांगला मिळणार आहे.
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. सेन्सेक्स ४२ हजारांवरून २६ हजार आणि सध्या ३४ हजारांवर आला आहे. अर्थव्यवस्थेमध्ये असा चढउतार होत असतो. २००८ मध्येही अशाच प्रकारे आर्थिक संकट आले होते. गुंतवणूकदारांना भीती वाटली होती. यामध्येही अनेकांनी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरली. पुढील काही महिने कोरोनाचे सावट राहण्याची शक्यता असून, गुंतवणूक करताना ‘मनी मॅनेजर’ महत्त्वाचे असल्याचे जाजू यांनी सांगितले.
चंद्रशेखर टिळक म्हणाले, जीवनामध्ये दुचाकी असल्यास चारचाकी घेणे, मुलांना चांगले शिक्षण देणे, मोठे घर घेणे आणि निवृत्तीनंतर चांगले आयुष्य जगणे असे लक्ष्य असते. यासाठी मिळणाऱ्या उत्पन्नातून दर महिन्याला बचत केली जाते. मात्र, ही गुंतवणूक योग्य ठिकाणी केली तरच चांगला फायदा मिळू शकतो. कोरोनामुळे गुंतवणुकीचा पॅटर्न बदललेला आहे.
पूर्वी कार्यालयामध्ये जाऊन काम करत होते. आता बहुतांशी वर्क फॉर्म होम करत आहेत. त्यामुळे काहींचे पगार अथवा उत्पन्न कमी-अधिक झाले आहे. पूर्वी ‘उत्पन्न वजा
खर्च शिल्लक रक्कम बचत’
अशी संकल्पना होती. आता यामध्ये बदल करण्याची गरज असून ‘उत्पन्न वजा गुंतवणूक शिल्लक रकमेतून खर्च’ असे करण्याची वेळ आली आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गुंतवणूक केल्यास महिन्याला चांगले उत्पन्नही मिळू शकते. म्युच्युअल फंड गुंतवणूक व्यावसायिक आहे. गुंतवणूकदाराचे वय, धोका पत्करण्याची क्षमता पाहणे महत्त्वाचे आहे, असेही टिळक यांनी गुंतवणूकदारांना सुचविले.
कोरोनाच्या संकटामध्ये कोणता खर्च अनावश्यक आणि आवश्यक हे लोकांना समजले आहे. त्यामुळे विचारपूर्वक गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड ही सुवर्णसंधी आहे. यावेळी विवेक मेहेत्रे यांनी सूत्रसंचालन केले.
>तज्ज्ञांच्या टिप्स
जीवन विमा उतरविणे योग्य, पण विमा पॉलिसी म्हणजे गुंतवणूक नाही. निवृत्तीनंतर म्युच्युअल फंडच योग्य गुंतवणूक
कोरोना संकटात लवकरात लवकर गुंतवणूक केल्यास फायदा जादा मिळणार.
मालमत्ता, ठेवी, सोने खरेदीपेक्षा इक्विटी शेअर्समधील गुंतवणूक परतावा सर्वाधिक
प्रथम गुंतवणूक करत असाल तर सिस्टीमेटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) योग्य ठरेल
एसआयपी थांबविल्यास भविष्यातील उद्दिष्ट्ये पूर्ण होण्यास अडचणीचे ठरू शकते.
>गौरव जाजू,
रिजनल हेड, आयसीआयसीआय म्युच्युअल फंड

Web Title: Response to Mutual Fund Golden Opportunity for Dream Fulfillment, ‘Lokmat’ and ‘ICICI Prudential Mutual Fund’ webinars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.