कधी करायची म्युच्युअल फंडात गुंतवणूक?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 12:57 PM2020-03-02T12:57:00+5:302020-03-02T13:00:38+5:30

तुम्हाला दोन-तीन महिन्यांनी पैसे लागणार आहेत?  पण नुसतेच बचत खात्याला ठेवून किती व्याज मिळणार अशावेळी तुम्ही फंडात पैसे गुंतवू शकता.

Which is the Best Time to Invest in Mutual Funds | कधी करायची म्युच्युअल फंडात गुंतवणूक?

कधी करायची म्युच्युअल फंडात गुंतवणूक?

googlenewsNext

म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूकदारांना अप्रत्यक्षरीत्या शेअर बाजारात व व रोखे बाजारात गुंतवणूक करून देण्याची संधी देणारी योजना होय. तुमच्या गरजेनुसार कोणता फंड हवा आहे? याचा अभ्यास करून तुम्ही फंडात गुंतवणूक करू शकता. फंड मॅनेजर म्हणजेच निधी व्यवस्थापक आणि त्याच्या हाताखाली असलेली तज्ञ मंडळी बाजाराचा व्यवस्थित अभ्यास करून तुमचे पैसे कसे गुंतवायचे? याचा निर्णय घेतात. पैसे कधी गुंतवावेत?  याचा निर्णय प्रत्येक व्यक्ती आणि त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे.

तुम्हाला दहा-पंधरा वर्ष छान गुंतवणूक करून त्याचे रिटर्न हवे असतील तर दरमहा थोडे थोडे पैसे गुंतवायची सुद्धा यात सोय आहे.

तुम्हाला दोन-तीन महिन्यांनी पैसे लागणार आहेत?  पण नुसतेच बचत खात्याला ठेवून किती व्याज मिळणार अशावेळी तुम्ही फंडात पैसे गुंतवू शकता.

तुमच्या घरात एका चिमुकल्या बाळाचा जन्म झाला आहे, त्याच्या शिक्षणासाठी पैसे जमवायचे आहेत? तर मग गुंतवा म्युच्युअल फंडात पैसे! अगदी हळू हळू सावकाश फंड वाढू दे! जशी तुमच्या मुलाची किंवा मुलीची वाढ होईल तसा फंड सुद्धा वाढेल.

पन्नाशी जवळ येत चालली आहे, आता रिटायरमेंट दिसायला लागली? रिटायर झाल्यावर पेन्शन नाहीये? मग दर महिन्याला थोडे थोडे पैसे लागणारच की हो! आत्तापासूनच फंडात पैसे गुंतवा आणि हळूहळू तुमच्याच रिटायरमेंटची तुम्हीच छानशी सोय करा.

तुम्हाला नुकतीच नोकरी लागली आहे, तीन वर्षात बुलेट घ्यायची किंवा आई-बाबांना घेऊन मस्त फिरायला जायचंय? थोडेसे पैसे दर महिन्याला जमतात?  कधी कधी जास्त  जमतात?  गुंतवा म्युच्युअल फंडात!

अपेक्षित वाढ मिळाली की फंड विकून टाका आणि पैसे खात्याला जमा करा.

अचानक अपेक्षेपेक्षा जास्त बोनस कंपनीने दिला?  उगाचच कुठेतरी खर्च होतो?  तीन ते पाच वर्षासाठी पैसे गुंतवून ठेवले तर कुठेतरी नक्कीच वापरता येतील असा विचार मनात आलाय? मग थोडी कमी जोखीम असलेल्या एखाद्या फंडात पैसे गुंतवायला काय हरकत आहे?

थोडक्यात काय!  तुमचं वय कितीही असो, तुमचं बजेट कितीही असो आणि तुमची गरज वेगवेगळी! असो प्रत्येकाच्या गरजा ओळखून म्युच्युअल फंड आपापल्या योजना जाहीर करतात. मग करायला हवी म्युच्युअल फंडात गुंतवणूक!

 

Web Title: Which is the Best Time to Invest in Mutual Funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.