म्युच्युअल फंडात पैसे कुणी गुंतवावेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 10:02 AM2020-03-02T10:02:45+5:302020-03-02T10:03:06+5:30
म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार, रोखे बाजार यामध्ये गुंतवणूक करण्याचा राजमार्ग होय.
पैसा कमावणे हे जेवढं कठीण काम एवढच मिळालेला पैसा कुठे गुंतवायचा? हे दुसरं कठीण काम! बरं आपण गुंतवलेला पैसा हा ज्याच्याकडे देतोय , ज्या कंपनीत गुंतवतो ती अधिकृत आहे ना? का तुमचे पैसे परस्पर घेऊन कोणीतरी लंपास होणार आहे? या सगळ्यापासून दूर जावं आणि पैसे एखाद्या बँकेत गुंतवावेत तर ही बँक बुडेल की काय अशी शंका! राष्ट्रीयकृत बँकांमध्ये पैसे ठेवले तर त्या बँका सरकारी असल्यामुळे पैसे बुडत नाहीत पण मिळणारे व्याज कमी, त्यांनी आपली गरजही भागत नाही!
अशावेळी एक हक्काचा साथीदार आपल्या मदतीला आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड!
म्युच्युअल फंड म्हणजे काय?... जाणून घ्या सोप्या शब्दांतhttps://t.co/6W3igQnsMB#Mutualfund
— Lokmat (@MiLOKMAT) March 1, 2020
म्युच्युअल फंडात कुणी पैसे गुंतवावेत?
म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजार, रोखे बाजार यामध्ये गुंतवणूक करण्याचा राजमार्ग होय. शेअर बाजारात थेट पैसे गुंतवायची जोखीम घ्यायला बरेच जण घाबरतात. बऱ्याच वेळेला त्यांना शेअर बाजाराचं ज्ञान नसतं. नक्की काय वाचायचं?, कुठे वाचायचं?, कसं समजून घ्यायचं? हे सुद्धा माहित नसतं. अशा वेळेला म्युच्युअल फंड तुमच्या मदतीला येतात. एका तज्ञ माणसाच्या हाताखाली एक टीम काम करते आणि तुमचा पैसा तुम्हाला अपेक्षित असलेल्या पर्यायांमध्ये गुंतवला जातो. म्युच्युअल फंडात कोणी गुंतवणूक करावी? या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपे आहे! कोणीही! हो!
टीम वर्क... म्युच्युअल फंडातील नफा वाढवणारा फंडा!https://t.co/Vc2DobKcGP#Mutualfund
— Lokmat (@MiLOKMAT) March 1, 2020
अगदी 18 वर्षे पूर्ण झालेली असोत किंवा नसो. पॅन कार्ड आणि आधार कार्ड असेल तर कोणताही भारतीय नागरिक, कंपनी, संस्था, हिंदू अविभक्त कुटुंब, पार्टनरशिप फॉर्म अशा सगळ्यांना म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. जर गुंतवणूक करणारी व्यक्ती त्याच्या मुलाच्या किंवा मुलीच्या नावाने गुंतवणूक करत असेल आणि ज्याच्या नावाने गुंतवणूक करायची ती व्यक्ती सज्ञान नसेल तर जॉईंट स्वरुपात सुद्धा गुंतवणूक करता येते.
वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरुवात करू शकता.
म्युच्युअल फंडात किती रक्कम गुंतवू?https://t.co/JKGqtNArLY#Mutualfund
— Lokmat (@MiLOKMAT) March 1, 2020