आपली बसच्या ताफ्यात पुन्हा १० वातानुकूलित ई-बसेस; मनपा आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 12:14 PM2023-06-22T12:14:58+5:302023-06-22T12:16:49+5:30

शहरातील एकूण ई-बसेसची संख्या आता ९६

10 air-conditioned-buses again in our bus fleet; Inaugurated by Nagpur Municipal Commissioner | आपली बसच्या ताफ्यात पुन्हा १० वातानुकूलित ई-बसेस; मनपा आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

आपली बसच्या ताफ्यात पुन्हा १० वातानुकूलित ई-बसेस; मनपा आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

googlenewsNext

नागपूर : महानगरपालिकेच्या ‘आपली बस’ सेवेच्या ताफ्यात आणखी १० बसेसचा समावेश झाला आहे. बुधवारी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या बसेसचे लोकार्पण केले. तसेच बसमध्ये बसून प्रवासाचा आनंददेखील घेतला.

या प्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त रवींद्र भेलावे, उपायुक्त सुरेश बगळे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कायर्कारी अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, योगेश लुंगे, विनय भारद्वाज, अरुण पिंपुरडे, समीर परमार, नागा सत्यम, सूर्यकांत अंबाळकर, सचिन गाडबेल, आदित्य छाजेड, मन यादव आदी उपस्थित होते. प्रसंगी आयुक्त म्हणाले की शहरातील जवळपास दीड लाख लोक आपली बसद्वारे प्रवास करतात. नागरिकांचा प्रवास सुखद, सुरक्षित आणि आल्हाददायी व्हावा याकरिता नागपूर महानगरपालिकेकडून वातानुकूलित ई- बसेसचा परिवहन विभागात समावेश करण्यात आला आहे.

- शहरात धावणार ९६ ई-बसेस

केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्तीय आयोगाच्या निधीतून व नागपूर महानगपालिकेच्या पर्यावरण विभाग यांच्या माध्यमातून महानरपालिकेच्या परिवहन विभागाला १० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार शहरातील एकूण ई-बसेसची संख्या आता ९६ झाली आहे. नागपूर महानगरपालिकेकडे ४६ नॉन एसी ई-बस आणि ४० एसी बसेस होत्या. ४० ए.सी. बसेस नागपूर स्मार्ट सिटीकडून प्राप्त झाल्या होत्या. तसेच आज पीएमआय कंपनीकडून प्राप्त झालेल्या १० बसेसमुळे ९६ बसेस झाल्या आहेत. पुढील काळात १३४ ई-बसेस मनपाला प्राप्त होणार आहेत.

- दिव्यांगांसाठी विशेष सोय

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या वातानुकूलित बसेसमध्ये दिव्यांगांसाठी विशेष सोय करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांना बसमध्ये चढण्यास मदत व्हावी याकरिता बसच्या दारात जवळ दिव्यांगांसाठी एक आधुनिक पट्टी लावण्यात आली आहे. बसचे दार बंद झाल्यावर ही पट्टी बंद होते, दार उघडल्यावर पट्टी उघडते. त्यामुळे दिव्यांग बांधवाना चढ- उतार करण्यास मदत होईल.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: 10 air-conditioned-buses again in our bus fleet; Inaugurated by Nagpur Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.