मनपा महाजनकोला देणार १० कोटी

By admin | Published: August 25, 2015 04:00 AM2015-08-25T04:00:56+5:302015-08-25T04:00:56+5:30

केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत महापालिका महाजनकोच्या सहकार्याने भांडेवाडी येथे दूषित पाण्यावर

10 crores will be given to the Mahanco | मनपा महाजनकोला देणार १० कोटी

मनपा महाजनकोला देणार १० कोटी

Next

नागपूर : केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत महापालिका महाजनकोच्या सहकार्याने भांडेवाडी येथे दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पासाठी मनपा महाजनकोला १० कोटींचा निधी देणार आहे. गुुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. २२ डिसेंबर २००६ रोजी या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. यावर १३०.११ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात केंद्र सरकार ५० तर राज्य सरकारचा २० टक्के वाटा असून मनपाला ३० टक्के खर्च करावयाचा आहे. ४ आॅक्टोबर २००८ रोजी मनपा व महाजनको यांच्यात प्रकल्पाबाबत करार झाला होता. केंद्र व राज्य सरकारकडून ९० कोटी रु. मिळण्याची अपेक्षा होती.
परंतु प्रत्यक्षात मनपाला ५९ कोटी ९ लाखाचा निधी मिळाला. चौथ्या टप्प्यात २२ कोटी ७६ लाखाची मागणी केली होती. परंतु अद्याप हा निधी मिळालेला नाही.(प्रतिनिधी)

Web Title: 10 crores will be given to the Mahanco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.