शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2022 10:30 PM2022-06-08T22:30:36+5:302022-06-08T22:31:01+5:30

Nagpur News शिक्षणासाठी दररोज दहा किलोमीटर पायी चालत जाणाऱ्या वनश्रीने कला शाखेत ९१.६७ टक्के गुण मिळवले असून ती जाईबाई चौधरी कॉलेजमध्ये टॉपर ठरली आहे.

10 km walk for education, Vanashree got the grass of success | शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास

शिक्षणासाठी १० कि.मी.चा पायी प्रवास, वनश्रीला मिळाला यशाचा घास

googlenewsNext
ठळक मुद्दे९१.६७ टक्के गुण, शाळेतून टाॅप, आयएएस हाेण्याचे ध्येय

नागपूर : यश असे सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी खडतर प्रवास करावा लागताे. अभावग्रस्त परिस्थिती असेल तर संघर्षाचे चटके अधिकच तीव्र असतात. सदर, मंगळवारी बाजारस्थित जाईबाई चाैधरी कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीत टाॅपर असलेल्या वनश्री साेनटक्केच्या वाट्यालाही हा प्रवास आला. ती राहत असलेल्या न्यू मानकापूरपासून काॅलेज आणि काॅलेज ते घर अशी राेजची १० किलाेमीटरची पायपीट तिने केवळ शिक्षणासाठी केली. ‘मी व्यायामासाठी पायी चालताे’, असे सांगून स्तब्ध करणाऱ्या वनश्रीला तिच्या यशासाठी वडिलांनी पेढ्याचा घास भरविला.

वनश्रीने कला शाखेत ९१.६७ टक्के गुण प्राप्त केले असून, ती जाईबाई चाैधरी काॅलेजमधून टाॅपर ठरली आहे. तिचे वडील दिलीप साेनटक्के यांची तिडंगी, कळमेश्वर येथे अल्पशी शेती आहे. शेती परवडेना म्हणून काही दिवस नागपूरला त्यांनी नेटवर्क मार्केटिंगचे कामही केले; पण काेराेनात ते सुटले. कधीतरी जमविलेल्या पैशांतून न्यू मानकापूरला झाेपडीवजा घर घेतले, त्याचाच काय ताे आसरा.

वनश्री मुळातच हुशार म्हणून त्यांनी शिक्षणासाठी तिला प्राेत्साहित केले. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि घरी त्याचीच रिव्हिजन करून तिने अभ्यास केला. आवडीचा विषय असलेल्या इंग्रजीत तिला ८१ गुण आहेत. तिला दहावीतही चांगले गुण हाेते. आता वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्याची तिची इच्छा आहे; पण आयएएस अधिकारी हाेण्याचे तिचे स्वप्न आहे. तिने पहिला टप्पा गाठला आहे असला तरी अजून पुढचा प्रवास बाकी आहे आणि परिस्थितीमुळे ताे तेवढाच खडतरही आहे.

Web Title: 10 km walk for education, Vanashree got the grass of success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.