कामठी कॅन्टोनमेंट कोविड केअर सेंटरमध्ये १० ऑक्सिजन बेड सुरु होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:07 AM2021-05-16T04:07:54+5:302021-05-16T04:07:54+5:30
नागपूर : कामठी कॅन्टोनमेंट कोविड सेंटर येथे अगोदरपासून २६ खाटांचा विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आलेला असून, आता येथे ...
नागपूर : कामठी कॅन्टोनमेंट कोविड सेंटर येथे अगोदरपासून २६ खाटांचा विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आलेला असून, आता येथे १० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात येणार आहे. या कोविड सेंटरसाठी लागणारी आवश्यक वैद्यकीय उपकरणे, रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, डिजीटल एक्स रे मशीन येथे पुरविण्यात येणार आहे. कामठी कॅन्टोनमेंट येथे १० ऑक्सिजनयुक्त बेडची सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे येथील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा होणार त्रास, वेळ आणि पैसाही वाचणार आहे.
शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी या कोविड केअर सेंटरला भेट देऊन वैद्यकीय उपकरणांसह, इतर आवश्यक बाबींचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार अरविंद हिंगे, डॉ. अरुंधती काळे, डॉ. विवेक कुऱ्हाडे, अभियंता दीपक ठाकरे, राकेश सिंह आणि राजकुमार गजभिये उपस्थित होते.