बोगस बीटी बियाण्यांचे १०९ पॅकेट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 10:42 PM2019-05-17T22:42:01+5:302019-05-17T22:43:10+5:30

कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची पेरणीच्या अनुषंगाने लगबग सुरू होणार आहे. यंदा कापसाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याचाच फायदा घेत बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शुक्रवारी मौदा तालुक्यातील अडेगाव येथे धाड टाकून १०९ पॅकेट बोगस बीटी बियाणे जप्त केले. विशेष म्हणजे शासकीय गोदामात बीटी बियाण्यांची साठवण केली होती.

10 packets of bogus BT seeds seized | बोगस बीटी बियाण्यांचे १०९ पॅकेट जप्त

बोगस बीटी बियाण्यांचे १०९ पॅकेट जप्त

Next
ठळक मुद्देशासकीय गोदामात केला होता साठा :नागपूर जि.प.कृषी विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कृषी विभागाने खरीपाचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांची पेरणीच्या अनुषंगाने लगबग सुरू होणार आहे. यंदा कापसाचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्याचाच फायदा घेत बोगस बीटी बियाण्यांची विक्री करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शुक्रवारी मौदा तालुक्यातील अडेगाव येथे धाड टाकून १०९ पॅकेट बोगस बीटी बियाणे जप्त केले. विशेष म्हणजे शासकीय गोदामात बीटी बियाण्यांची साठवण केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार कृषी विभागाला मौदा तालुक्यातील अडेगाव येथे एका व्यक्तीकडून अवैध बीटीची विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे शुक्रवारी दुपारच्या सुमारास धाड टाकण्यात आली. येथील सिंचन विभागाच्या बंद गोदामात हे बीटी बियाणांचे पॅकेट ठेवून होते. यात १४ पॅकेट बिल्ला तर ९५ पॅकेट अरुणोदय नावाचे असल्याची माहिती आहे. रघू नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे हे पॅकेट असल्याचे सांगण्यात येते. कृषी विभागाने रघूच्या विरोधात मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यावर्षातील ही दुसरी कारवाई आहे. यापूर्वी बुटीबोरी येथे ९९९ बोगस बीटी बियाणे पॅकेट मिळाले होते. जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी पंकज लोखंडे यांनी ही कारवाई केली. बोगस बियाणे आणि खतांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे अधिकारी प्रवीण देशमुख यांनी तालुका स्तरावर भरारी पथक तयार केले आहे.

Web Title: 10 packets of bogus BT seeds seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.