‘ब्रुसेलोसिस’ आजाराने नागपुरातील १० टक्के पशुचिकित्सक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:03 AM2018-01-09T10:03:27+5:302018-01-09T10:05:20+5:30

‘ब्रुसेलोसिस’ एक घातक आजार असून गाई व म्हशींमध्ये हा व्हायरस आढळून येतो. नागपुरातील १० टक्के पशुचिकित्सक या आजाराने बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे.

10 percent of veterinarian in Nagpur disrupted 'Brucellosis' | ‘ब्रुसेलोसिस’ आजाराने नागपुरातील १० टक्के पशुचिकित्सक बाधित

‘ब्रुसेलोसिस’ आजाराने नागपुरातील १० टक्के पशुचिकित्सक बाधित

Next
ठळक मुद्देपशुसंवर्धन विभागाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘ब्रुसेलोसिस’ एक घातक आजार असून गाई व म्हशींमध्ये हा व्हायरस आढळून येतो. बाधित जनावराचे कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा त्याचे चामडे काढताना हाताला असलेल्या जखमेचा थेट संबंध येतो. त्यामुळे तो व्हायरस मनुष्याच्या शरीरात पसरतो. या आजारामुळे पशुसंवर्धन विभागालाच धोका निर्माण झाला आहे. १० टक्के पशुचिकित्सक या आजाराने बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे.
ब्रुसेलोसिस गाईंमध्ये आढळणारा आजार असून कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा थेट संपर्कात आल्याने मनुष्यालाही त्या आजाराची लागण होते. सुरुवातीला रुग्णाला सदर आजाराबाबत काहीही कल्पना नसते. मात्र रक्त तपासणीनंतर आजाराचे निदान होते. विशेष म्हणजे या आजाराच्या विळख्यात पशु चिकित्सक व गाईंचे चामडे काढणारे मोठ्या प्रमाणात आले आहेत.
नागपूर जिल्ह्यात ८ ते १० टक्के पशु चिकित्सकांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी उमेश हिरुळकर यांनी दिली. ब्रुसोलोसिस व्हायरस शरीरात पसरल्यानंतर अंगदुखी, गुडघेदुखी, वंध्यत्व येण्याचा धोका असतो. जसजसा व्हायरस वाढतो, त्याच प्रमाणात शारीरिक त्रास वाढतो. एकदा आजाराची लागण झाल्यानंतर त्यावर उपचारही नसल्याचे त्यांनी सांगितले. नियमित उपचाराने त्यावर नियंत्रण प्राप्त करता येते. पशुचिकित्सक व चामडी काढणारा वर्ग या जनावरांच्या थेट संपर्कात येतो.
पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांच्या रक्तांचे नमुने तपासले असता ८ ते १० टक्के डॉक्टरांमध्ये या आजाराचे गुणधर्म आढळून आलेत.
राज्यात नऊ ठिकाणी लसीकरण मोहीम
ब्रुसेलोसिस व्हायरस अत्यंत घातक असून बाधित जनावरांच्या संपर्कात आल्याने किंवा कच्चे दूध प्राशन केल्याने आजार जडतो. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी गाईच्या वासरांना लस दिली जाते. केंद्र शासनाने एक कार्यक्रम हाती घेतला असून चार ते आठ महिन्यांच्या वासरांना लस दिली जाणार आहे. यात राज्यातील नऊ जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यात १३ हजार लसीकरणाचे लक्ष्य निर्धारित केले आहे.

Web Title: 10 percent of veterinarian in Nagpur disrupted 'Brucellosis'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य