१० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस २० वर्षांचा कारावास; वर्षभर केले शोषण, खेळायच्या बहाण्याने बोलवायचा घरी

By दयानंद पाईकराव | Published: June 14, 2024 09:55 PM2024-06-14T21:55:04+5:302024-06-14T21:55:15+5:30

नीलेश ऊर्फ मिर्चीलाल किशोरी चुटेलकर (वय ३१ वर्षे, रा. इंदिरानगर, जाटतरोडी, इमामवाडा) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्या विरोधात इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

10-year-old child molested, accused gets 20 years imprisonment | १० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस २० वर्षांचा कारावास; वर्षभर केले शोषण, खेळायच्या बहाण्याने बोलवायचा घरी

१० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीस २० वर्षांचा कारावास; वर्षभर केले शोषण, खेळायच्या बहाण्याने बोलवायचा घरी

नागपूर : दहा वर्षीय अल्पवयीन मुलीला खेळण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर वर्षभर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास, ९०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

नीलेश ऊर्फ मिर्चीलाल किशोरी चुटेलकर (वय ३१ वर्षे, रा. इंदिरानगर, जाटतरोडी, इमामवाडा) असे या नराधमाचे नाव आहे. त्याच्या विरोधात इमामवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सहजिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओ. पी. जैस्वाल यांनी निर्णय दिला. ही घटना २६ मार्च २०१५ पूर्वी घडली. दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घराच्या परिसरामध्ये वास्तव्यास होती. ती अल्पवयीन असल्याचा फायदा घेवुन आरोपी निलेश तिला खेळण्याच्या बहाण्याने आपल्या घरी बोलवायचा.

तसेच, तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. हा प्रकार एक वर्षांपर्यंत चालला. अल्पवयीन मुलीच्या पालकांना याची माहिती मिळताच त्यांनी नराधम नीलेश विरोधात इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार इमामवाडा पोलिसांनी आरोपी नीलेशला २७ एप्रिल २०१५ रोजी अटक केली होती. न्यायालयाने सर्व बाजू व साक्ष लक्षात घेत नीलेशला दोषी ठरविले. शासनातर्फे अ‍ॅड. रश्मी खापर्डे यांनी, तर आरोपीतर्फे अ‍ॅड. एन. एन. राऊत यांनी बाजू मांडली.

Web Title: 10-year-old child molested, accused gets 20 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.