राज्यात आता १०० ‘ब्रीज कम बंधारे’ : सी.पी. जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 09:33 PM2018-11-24T21:33:24+5:302018-11-24T21:35:29+5:30
रस्ते व पुलांची बांधणी करीत असताना सिंचनाच्या दृष्टीनेही विचार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्रात १०० ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यात येणार आहेत. हे बंधारे गोडबोले गेटच्या धर्तीवर आॅटोमॅटिक असतील. त्याचा लाभ सिंचनासाठी होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी.पी. जोशी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्ते व पुलांची बांधणी करीत असताना सिंचनाच्या दृष्टीनेही विचार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्रात १०० ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यात येणार आहेत. हे बंधारे गोडबोले गेटच्या धर्तीवर आॅटोमॅटिक असतील. त्याचा लाभ सिंचनासाठी होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी.पी. जोशी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.
मानकापूर येथील क्रीडा संकुल परिसरात आयोजित भारतीय रस्ते परिषदेच्या अधिवेशनादरम्यान शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना जोशी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात गंगा नदीवर अशा प्रकारचे बंधारे बांधण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही मोठ्या नदींवर असे पूल असलेले बंधारे बांधण्याची योजना आहे. प्रत्येक नदीवर १० ब्रिज कम बंधारे बांधण्यात येतील. नंदूरबार आणि नागपूर येथून सुरुवात करण्यात येणार आहे. हे बंधारे गोदावरी वर्धा, वैनगंगा आदी नद्यांवर बांधण्यात येणार आहे. गोडबोले गेटच्या धर्तीवर त्याचे दरवाजे हे आॅटोमेटिक असतील. पाणी जास्त भरले की, ते आॅटोमेटिक उघडतील. यातून अडवण्यात येणारे पाणी हे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वापरता येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.