नागपूर मनपाच्या कंत्राटदारांचे १०० कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 09:51 PM2018-02-03T21:51:08+5:302018-02-03T21:54:49+5:30
महापालिकेतील कंत्राटदारांची १०० कोटींची बिले थकलेली आहेत. गेल्या काही महिन्यापासून नुसती आश्वासने मिळत आहे. सरकारकडूनही अनुदान बिल मिळत नसल्याने आपल्या मागण्याकडे पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाल येथील टाऊ न हॉलपुढे शनिवारी महापालिका कंत्राटदार असोसिएशनतर्फे धरणे देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेतील कंत्राटदारांची १०० कोटींची बिले थकलेली आहेत. गेल्या काही महिन्यापासून नुसती आश्वासने मिळत आहे. सरकारकडूनही अनुदान बिल मिळत नसल्याने आपल्या मागण्याकडे पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाल येथील टाऊ न हॉलपुढे शनिवारी महापालिका कंत्राटदार असोसिएशनतर्फे धरणे देण्यात आले.
शहरातील विकास कामे सुरू ठेवायची असेल तर कंत्राटदारांना कामाचे बिल मिळाले पाहिजे. बिल न मिळाल्यास भविष्यात विकास कामे बंद ठेवण्यात येतील. पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना घेराव करू, असा इशारा कंत्राटदार संघटनेचे विजय नायडू यांनी दिला. महापालिका प्रशासन व शासनाने मागण्याकडे लक्ष न दिल्यास कंत्राटदारांवर विदर्भातील शेतक ऱ्यांसारखी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही. याची जबाबदारी शासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
कंत्राटदारांचे आंदोलन सुरू असताना सभागृह संपल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिका ऱ्यांनी कंत्राटदारांना येथून तात्काळ निघून जा अन्यथा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. यामुळे काहीवेळ वातावरण तापले होते.
आंदोलनात विजय नायडू यांच्यासह उपाध्यक्ष प्रकाश पोटपोसे, सचिव संजीव चौबे, शेख रमजान, युवराज मानकर, मतिन अहमद, रफीक अहमद, राजू वंजारी, विनोद आष्टीकर, नरेन्द्र हटवार, विनोद मडावी, विनय घाटे, विनोद दंडारे, अनंत जगनीत, नाझीम, आफताब, प्रशांत ठाकरे, प्रदीप वाघमारे, प्रशांत देशमुख, प्रशांत मारशेट्टीवार,सिध्दार्थ बैसारे, चंदू महाजन, सलीम अन्सारी, महेन्द्र सोनटक्के, विनोद अतकर, पदम हर्बे, मोमीन मुसळे, कायरकर शेंडे, प्रमोद ठाकरे, प्रशांत घोडमारे, अमित कर्णे, जितू बाथो, संतोष खरबकर, आकीब खान, कुमार बांते, विनोद मडावी आदी उपस्थित होते.