नागपुरात दररोज तयार होणार १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:09 AM2019-03-28T10:09:52+5:302019-03-28T10:11:53+5:30

भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. कचरा प्रक्रि या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे.

100 metric ton compost manure to be prepared daily in Nagpur | नागपुरात दररोज तयार होणार १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत

नागपुरात दररोज तयार होणार १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत

Next
ठळक मुद्देडम्पिंगयार्डची २१ एकर जागा रिकामी होणारबायोमायनिंगचे यश  

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. कचरा प्रक्रि या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे. मे महिन्यापासून दर महिन्याला भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथील एक एकर जागा रिकामी होणार आहे. काही महिन्यात भांडेवाडी येथील २१ एकच जागा रिकामी होईल. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणारा दुर्गंधीचा त्रास कायमचा बंद होणार आहे.
भांडेवाडी येथे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रि या करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मात्र यासाठी नियुक्त करण्यात आलेली कंपनी तातडीने प्रकल्प उभारण्यास तयार दिसत नाही. स्वच्छ सर्वेक्षणात शहर माघारल्याने स्वच्छतेवर प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. परंतु कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प राबविताना यातून निर्माण होणाऱ्या जैव उत्पादनातून महापालिकेला उत्पन्न व्हावे. या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.
भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे काही वर्षापूर्वी हंजर कंपनी कचऱ्यापासून खत तयार करण्याचे काम करीत होती. परंतु या खताला मागणी नव्हती. अशा परिस्थितीत दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण झाल्यास त्याचा वापर कुठे करावा असा प्रश्न उभा राहू नये यासाठी नियोजन करावे लागणार आहे. बायोडिझेल व सीएनजी निर्माण केल्यास महापालिकेच्या बसेस त्यावर चालविता येईल. यातून आर्थिक बचत होईल. याचा विचार करता बायोडिझेल व सीएनजी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे बांगर यांनी सांगितले.

हनुमाननगर झोनचे ट्रान्सफर स्टेशन सुरू
महापालिकेच्या दहा झोनमध्ये दहा कचरा ट्रान्सफर स्टेशन बनविण्याचा प्रस्ताव आहे. एप्रिलपर्यंत जागा निशिचत करावयाच्या आहेत. हनुमाननगर झोन येथील स्टेशन सुरू करण्यात आले आहे. स्टेशन परिसरातील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीपासून त्रास होणार नाही. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया क रण्यात येणार आहे. याच धर्तीवर शहरातील इतर झोनमध्ये ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

Web Title: 100 metric ton compost manure to be prepared daily in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.