१०० टँकर लवकरच बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:06 AM2021-05-23T04:06:50+5:302021-05-23T04:06:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ३४६ टँकरपैकी १२० टँकर वर्षभरापूर्वी बंद करण्यात आले. ...

100 tankers closed soon | १०० टँकर लवकरच बंद

१०० टँकर लवकरच बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ३४६ टँकरपैकी १२० टँकर वर्षभरापूर्वी बंद करण्यात आले. यामुळे टँकर खर्चात वर्षाला १० ते १२ कोटींची बचत झाली. आता कळमना व वांजरा येथील जलकुंभावरून पाणीपुरवठा सुरू होणार असल्याने पुन्हा १०० टँकर बंद केले जातील. यामुळे वर्षाला ७ ते ८ कोटींची बचत होण्याची अपेक्षा आहे.

नासुप्रद्वारे कळमना जलकुंभ मनपाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे. जलवाहिन्या टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुढील काही दिवसांत या जलकुंंभावरून पाणीपुरवठा होणार असल्याने राजलक्ष्मीनगर, पार्वतीनगर, देवीनगर, गुलशननगर, राजीव गांधीनगर, कळमना या भागातील टँकर्सद्वारे पाणीपुरवठा बंद करण्यात येईल. त्यामुळे येथील दररोजच्या १८० फेऱ्या कमी होतील. वांजरा येथे बांधण्यात आलेली पाण्याची टाकी चार्ज झाल्यास कामठी मार्गावरील उप्पलवाडी, शिवनगर, धम्मदीपनगर, डायमंडनगर, हस्तिनापूर, बंधू सोसायटी, भीमवाडी आदी भागातील नागरिकांना नळकनेक्शन दिल्यास या भागातील टँकर्सच्या ६० ते ७० फेऱ्या कमी होतील. नारा कमांड एरियांतर्गत समतानगर, पांजरा येथील टँकर्सच्या दररोजच्या ७० ते ८० फेऱ्या कमी होतील. अशाप्रकारे लवकरच १०० टँकर कमी होण्याची आशा आहे.

...

वर्षभरात ८ कोटींचा भुर्दंड

कळमना, नारा, वांजरी व चिंचभुवन या चार जलकुंभांची कामे मार्च २०२० पर्यंत पूर्ण करून यावरून पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षित होते. वेळेत जलकुंभांची कामे पूर्ण न झाल्याने मनपाला ७ ते ८ कोटींचा खर्च करावा लागला. याचा विचार करता या जलकुंभांवरून नागरिकांना लवकर पाणी मिळेल, अशी आशा आहे.

...

थकबाकीदारांची नळजोडणी कापू नका

कोविड-१९ च्या काळात गरीब लोकांवर उपासमारीची पाळी आल्यामुळे अशा नागपुरातील गरीब लोकांवर पाणीबिलाची थकबाकी असल्यामुळे कोणत्याही नागरिकांची नळजोडणी लॉकडाऊन संपेपर्यंत कापण्यात येऊ नये, असे आदेश जलप्रदाय समिती सभापती संदीप गवई यांनी दिले. तसेच कळमना टाकीचे काम ३१ मे पर्यंत पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला शुक्रवारी दिले.

Web Title: 100 tankers closed soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.