१०० टक्के व्हीव्हीपॅटचा वापर : ३८०० ठिकाणी प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:27 PM2019-03-11T22:27:50+5:302019-03-11T22:33:49+5:30

निवडणूक आयोगाने ही निवडणूक व्हीव्हीपॅटनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर १०० टक्के करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यासाठी ६१११ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ते पुरेसे आहे. व्हीव्हीपॅटनुसार निवडणुका होत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे याबाबत जनजागृती करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात तब्बल ३८०० ठिकाणी व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तब्बल पावणेदोन लाख नागरिकांनी प्रत्यक्ष व्हीव्हीपॅटचा वापर करून याची कार्यप्रणाली समजून घेतली. यासोबतच विविध संस्थांमध्येही याचे सादरीकरण करण्यात आले.

100% VVPAT Usage: Demonstrations at 3800 locations | १०० टक्के व्हीव्हीपॅटचा वापर : ३८०० ठिकाणी प्रात्यक्षिके

१०० टक्के व्हीव्हीपॅटचा वापर : ३८०० ठिकाणी प्रात्यक्षिके

Next
ठळक मुद्देपावणेदोन लाख लोकांनी समजून घेतली प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक आयोगाने ही निवडणूक व्हीव्हीपॅटनुसार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर १०० टक्के करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले. नागपूर जिल्ह्यासाठी ६१११ व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत, ते पुरेसे आहे. व्हीव्हीपॅटनुसार निवडणुका होत असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे याबाबत जनजागृती करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात तब्बल ३८०० ठिकाणी व्हीव्हीपॅटची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तब्बल पावणेदोन लाख नागरिकांनी प्रत्यक्ष व्हीव्हीपॅटचा वापर करून याची कार्यप्रणाली समजून घेतली. यासोबतच विविध संस्थांमध्येही याचे सादरीकरण करण्यात आले.
व्हीव्हीपॅटने निवडणुका होत असल्याने मतदानाला उशीर होईल, हे निवडणूक आयोगाने आधीच गृहित धरले आहे. त्यामुळे त्यांनी १२०० ते १४०० चे मतदान केंद्र तयार केले आहे. यापेक्षा जास्त मतदार आल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदार केंद्र राहतील. याला आब्जलरी मतदान केंद्र असे म्हटले जाते. नागपूर जिल्ह्यात असे ४७ ऑब्जलरी मतदान केंद्र आहेत. यात शहरात २८ व रामटेकमध्ये १९ आहेत. पत्रपरिषदेदरम्यान जिल्हाधिकारी मुदगल यांनी पत्रकारांसमोरही व्हीव्हीपॅटचे सादरीकरण करून दाखवले.
दिव्यांगांची घेणार विशेष काळजी
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात सात हजार दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या खोलीत त्यांना जाता यावे म्हणून रॅम्प तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शौचालय, पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात येईल. इतकेच नव्हे तर दिव्यांग मतदाराने मागणी केल्यास त्यांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्थाही प्रशासनातर्फे करण्यात येईल.
प्रत्येक विधानसभेत एक महिला विशेष बूथ
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभेत एक विशेष महिला बूथ तयार करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे नागपूर लोकसभा क्षेत्रात ६ व रामटेकमध्ये ६ असे एकूण १२ विधानसभा क्षेत्रात १२ महिला विशेष बूथ राहतील. या बूथवर कर्मचाऱ्यांपासून तर अधिकाऱ्यांपर्यंतचे सर्व महिला राहतील.
उमेदवारांच्या सोशल मीडियावरही वॉच : पेड न्यूजसाठी कमिटी स्थापन
सार्वजनिक लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून प्रशासन इलेक्शन मोडवर आले आहे. नागपूर व रामटेक लोकसभा निवडणूक पहिल्याच टप्प्यात होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभेची पोटनिवडणूकही होणार असून यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या सोशल मीडियावरही प्रशासनाची नजर राहील, हे विशेष.
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेद्वारा निवडणुकीबाबतच्या तयारीची सविस्तर माहिती दिली. उमेदवारांना उमेदवारी अर्जासोबतच जे अ‍ॅफिडेव्हीट द्यावे लागते, त्यात यंदा उमेदवारांना ते वापरत असलेले वॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्युटर, फेसबूक, यूट्युुब आदीची माहितीही भरावयाची आहे. यासोबतच पेड न्यूवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटीच स्थापनाही करण्यात आली आहे. या कमिटीमध्ये मीडियाच्या प्रतिनिधीसह सायबर तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. यावेळी सोशल मीडियावरील जाहिरातीवरही विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पत्रपरिषदेत पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त अभिजित बांगर, नासुप्र सभापत शीतल उगले, सीईओ संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा आदी उपस्थित होेते.
जाहिरात प्रकाशनासाठी मंजुरी आवश्यक
जाहिरातीवर नजर ठेवण्यासाठी मीडिया मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्यात आली आहे. जाहिरात किंवा प्रचार साहित्याचा मजकूर (अ‍ॅडिओ-व्हिडीओ) प्रकाशन करण्यापूर्वी तो मीडिया मॉनिटरिंग कमिटीला दाखविणे बंधनकारक आहे. त्यांचे प्रमाणपत्र घेतल्यानंतरच ते प्रकाशित केले जाईल. पेड न्यूजसंदर्भात काही तक्रार आल्यास २४ तासाच्या आत समितीला त्यावर निर्णय घ्यायचा आहे. समितीकडे तक्रार असल्यास कमिटीची तातडीची बैठक होईल. त्याची खातरजमा केली जाईल. त्यात काही तथ्य आढळल्यास संबंधितांना नोटीस पाठवून खुलासा मागवला जाईल. खुलासा समाधानकारक राहिला तर ठीक अन्यथा पेड न्यूजचा खर्च संबंधिताच्या खात्यात जोडला जाईल.
हे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी
नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल हे नागपूर लोकसभा तर अतिरिक्ति जिल्हाधिकारी श्रीकांत फडके हे रामटेक लोकसभा निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. यासोबतच प्रत्येक विधानसभेसाठी सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
नागपूर लोकसभा - अश्विन मुदगल (जिल्हाधिकारी)
नागपूर दक्षिण-पश्चिम - शिरीष पांडे (उपविभागीय अधिकारी नागपूर शहर)
दक्षिण नागपूर - जगदीश कातकर (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)
पूर्व नागपूर - शीतल देशमुख (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)
मध्य नागपूर - व्ही.बी. जोशी (उपजिल्हाधिकारी-भूसंपादन)
पश्चिम नागपूर - ज्ञानेश भट - उपजिल्हाधिकारी-भूसंपादन
उत्तर नागपूर - सुजता गंधे - उपल्हिाधिकारी राजस्व

रामटेक लोकसभा- श्रीकांत फडके (अतिरिक्त जिल्हाधिकारी)
काटोल - श्रीकांत उंबरकर (उपविभागीय अधिकारी-काटोल)
सावनेर - संजय पवार - (उपविभागीय अधिकारी-सावनेर)
हिंगणा - सूरज वाघमारे- (उपविभागीय अधिकारी-नागपूर-ग्रामीण)
उमरेड - जे.पी. लोंढे -(उपविभागीय अधिकारी-उमरेड)
कामठी - व्ही. सवरंगपत्ते (उपविभागीय अधिकारी-मौदा)
रामटेक - जोगेंद्र कट्यारे (उपविभागीय अधिकारी-रामटेक)

Web Title: 100% VVPAT Usage: Demonstrations at 3800 locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.