१०० आपली बस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:47+5:302021-06-09T04:08:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘अनलॉक’अंतर्गत पहिल्या दिवशी सोमवारी महापालिकेच्या १०० आपली बस सुरू होत्या. पूर्ण प्रवासी क्षमतेने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘अनलॉक’अंतर्गत पहिल्या दिवशी सोमवारी महापालिकेच्या १०० आपली बस सुरू होत्या. पूर्ण प्रवासी क्षमतेने बस चालविण्यात येत असल्या तरी बसमधून उभ्या प्रवाशांना मनाई आहे. प्रवाशांची गर्दी विचारात घेता, मंगळवारी १२० बस धावणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे अधिकारी रवींद्र पागे यांनी दिली.
मनपाच्या शहर बससेवेत ४३७ बस आहेत. यातील ३६० सुरू असतात, तर १० टक्के बस राखीव असतात. यात २३७ स्टँडर्ड, १५० मिडी बसेस, ४५ मिनी बसेस तर महिलांसाठी ६ विशेष तेजस्विनी बस आहेत.
शहर बसला प्रतिसाद कसा मिळतो, याचा शुक्रवारच्या बैठकीत आढावा घेतला जाईल. त्यानंतर गरजेनुसार बसची संख्या वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रवाशांची गर्दी वाढली तर बसेस टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येतील.