नागपुरात १०१ निवडणूक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:41 PM2019-04-08T22:41:50+5:302019-04-08T22:43:10+5:30
निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपालाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. नागपूर जिल्ह्यात निवडणुकीकरिता १९ हजार कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली असून, १०१ कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानाचा हक्क बजावला. यासाठी निवडणूक विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपालाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. नागपूर जिल्ह्यात निवडणुकीकरिता १९ हजार कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली असून, १०१ कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानाचा हक्क बजावला. यासाठी निवडणूक विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती.
निवडणूक कामाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका, निवडणूक कार्य प्रमाणपत्राकरिता अर्जाचे नमुने द्वितीय प्रशिक्षणाच्या वेळी देण्यात येऊन हे फार्म सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ज्या कर्मचाऱ्यांनी मतपत्रिकांकरिता अर्ज सादर केले, त्यानुसार टपाली मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिकेचे वाटप व मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ७ एप्रिल रोजी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.
जिल्हास्तरावरील सुविधा केंद्र स्थापन करण्यात येऊन कर्मचाºयांना ३४ टपाली मतपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच आज जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सुविधा केंद्रात एकूण ६७ टपाली मतपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.
कुणीही वंचित राहणार नाही
जे कर्मचारी केंद्रात टपाली मतपत्रिका घेण्यास उपस्थित झाले नाही त्यांच्या मतपत्रिका पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असून, त्यांना २३ मे रोजी सकाळी ७.५९ वाजेपूर्वी टपाली मतदान करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले आहे.