‘इन्फ्लुएन्झा’मुळे नागपुरात १०१ रुग्णांचा मृत्यू; अडीच महिन्यात स्वाइन फ्लूचे १४ रुग्ण

By सुमेध वाघमार | Published: March 17, 2023 10:03 PM2023-03-17T22:03:40+5:302023-03-17T22:04:45+5:30

Nagpur News ‘इन्फ्लुएन्झा’ या विषाणूने नागपूर शहरात मागील सात वर्षांत तब्बल १०१ रुग्णांचा बळी घेतला आहे.

101 patients died in Nagpur due to 'influenza'; 14 patients of swine flu in two and a half months | ‘इन्फ्लुएन्झा’मुळे नागपुरात १०१ रुग्णांचा मृत्यू; अडीच महिन्यात स्वाइन फ्लूचे १४ रुग्ण

‘इन्फ्लुएन्झा’मुळे नागपुरात १०१ रुग्णांचा मृत्यू; अडीच महिन्यात स्वाइन फ्लूचे १४ रुग्ण

googlenewsNext

नागपूर : विषाणूमुळे होणार आजार म्हणजे ‘इन्फ्लुएन्झा’. या विषाणूने नागपूर शहरात मागील सात वर्षांत तब्बल १०१ रुग्णांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे, एकीकडे ‘एच३एन२’चे रुग्ण वाढत असताना अडीच महिन्यात ‘एच१एन१’ म्हणजे स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या १४वर पोहोचली आहे.

‘इन्फ्लुएन्झा’चा वेगवेगळे उपप्रकार आहेत. यात ‘टाइप ए’चे ‘एच१एन१’, ‘एच२एन२, ‘एच३एन२’ आदी आढळून येतात. या आजाराचे सर्वसाधारणपणे लक्षणे ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्यूमोनिया आदी लक्षणे आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, २०१७ मध्ये ‘इन्फ्लुएन्झा’मुळे ४६, २०१८ मध्ये ११, २०१९मध्ये २२, २०२२मध्ये २१ तर २०२३ मध्ये १ असे १०१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे.

- अडीच महिन्यात ८९० संशयित रुग्ण

१ जानेवारी ते १७ मार्च २०२३ या अडीच महिन्याच्या कालावधीत ‘इन्फ्लुएन्झा’ संशयित ८९० रुग्णांची नोंद झाली. शिवाय, ‘एच१एन१’चे १२, ‘एच३एन२’चे ३, ‘एच३एन२’ व ‘एच१एन१’चे २ असे एकूण १७ रुग्ण आहेत.

- शहरात ३२ खासगी रुग्णालयात उपचार

शहरात ‘इन्फ्लुएन्झा’वर ३२ खासगी व दोन शासकीय रुग्णालयांमध्ये उपचाराची सोय उपलब्ध आहे. सोबतच मधुमेह व उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी पाच हजार ‘इन्फ्लुएन्झा’ लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या लस मनपा दवाखान्यात दिल्या जात आहेत.

Web Title: 101 patients died in Nagpur due to 'influenza'; 14 patients of swine flu in two and a half months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य