पूर्व विदर्भातील १०.१८ लाख शेतकऱ्यांच्या खत्यात जमा होणार ‘पीएम किसान’हप्ता!
By गणेश हुड | Published: July 26, 2023 06:39 PM2023-07-26T18:39:37+5:302023-07-26T18:39:49+5:30
पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो.
नागपूर : केंद्र सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याची रक्कम आज गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खत्यात जमा होणार आहे. पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील १० लाख १८ हजार ४१९ शेतकऱ्यांना १४ व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जातो. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १३ हफ्ते जमा झाले आहेत. गुरुवारी १४ वा हप्ता जमा होणार आहे.
१४ वा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थांना ई-केवायसी व आधार सीडिंग पूर्ण करणे गरजेचे होते. विभागातील सहा जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ८८ शेतकऱ्यांची इ-केवायसी बाकी असल्याने त्या शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही.