कोरोनाचे १०२ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:12 AM2021-08-18T04:12:52+5:302021-08-18T04:12:52+5:30

नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या मागील तीन दिवसांपासून पाचच्या आत आहे. मंगळवारी ३ नव्या रुग्णांची भर पडली. नागपूर जिल्ह्यात ...

102 active patients of corona | कोरोनाचे १०२ सक्रिय रुग्ण

कोरोनाचे १०२ सक्रिय रुग्ण

Next

नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या मागील तीन दिवसांपासून पाचच्या आत आहे. मंगळवारी ३ नव्या रुग्णांची भर पडली. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९७४ झाली आहे. पाच दिवसांपासून मृत्यूची नोंद नसल्याने मृतांची संख्या १०,११८वर स्थिर आहे. सध्या शहरात कोरोनाचे ९०, ग्रामीणमध्ये ९ तर जिल्हाबाहेरील ३ असे एकूण १०२ रुग्ण सक्रिय आहेत.

नागपूर जिल्ह्यात मंगळवारी तपासण्यांची संख्या वाढली. शहरात ३,४१३ तर ग्रामीणमध्ये ६६८ असे एकूण ४,०८१ तपासण्या झाल्या. यात शहरातून २, ग्रामीणमधून १ रुग्ण पॉझिटिव्ह आला. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,४०,०३५ झाली असून, मृतांची संख्या ५,८९३ वर पोहोचली आहे. ग्रामीणमध्ये रुग्णांची संख्या १,४६,१२३ तर मृतांची संख्या २,६०३ आहे. आज ४ रुग्ण कोरोनातून बरे झाले. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ४,८२,७५४ झाली. कोरोनाचा सक्रिय रुग्णांमध्ये ५३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये तर ४९ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

:: कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या: ४०८१

शहर : २ रु ग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू

ए. बाधित रुग्ण :४,९२,९७४

ए. सक्रिय रुग्ण : १०२

ए. बरे झालेले रुग्ण : ४,८२,७५४

ए. मृत्यू : १०११८

Web Title: 102 active patients of corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.