कोविड नियमांचे उल्लंघण, १.०३ कोटीचा दंड वसुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:11 AM2021-02-21T04:11:53+5:302021-02-21T04:11:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा प्रशासनातर्फे मागील दोन दिवसापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात तसेच नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात सोशल डिस्टंन्सिंग त्यासोबतच मास्क चा वापर न करणाऱ्या नागरिकांनी विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे आतापर्यंत १ कोटी ३ लक्ष ३० हजार १७४ रुपयाचा दंड वसूल केला आहे. यापैकी ग्रामीण भागात ५५ लाख ३९ हजार १७० रुपये तर नगर परिषदांच्या क्षेत्रात ४७ लाख ९१ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली .
जिल्हा प्रशासनातर्फे मास्क न वापरल्या याबद्दल तसेच सोशल डिस्टंन्सिंग न पालल्याबद्दल धडक मोहीम राबविण्यात येत आहे उपविभागीय महसूल अधिकारी तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे .
जिल्ह्यातील १४ ही तालुक्यात सामाजिक अंतर न पाडल्याबद्दल ७ लाख ८५ हजार रुपयाचा दंड तसेच मास्क न घातल्याबद्दल ४७ लाख ५३ हजार ९७० रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. नगर परिषदा व नगरपंचायत अशा जिल्ह्यातील एकूण २० नगर परिषदांमध्ये सामाजिक अंतर न पाळल्याबद्दल १२ लाख ३६ हजार ६८४ रुपये तर मास्क न वापरल्याबद्दल ३५ लाख ५४ हजार दोनशे २० रुपयाचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्यामुळे नागरिकांनी कोरोना संदर्भात दिलेल्या सूचनांचे सक्तीने पालन करावे. कुटुंबातील कुणालाही ताप सर्दी अथवा कोरोना संदर्भात लक्षणे असल्याचे आढळून आल्यास तात्काळ कोरोना संदर्भातील तपासणी करून घ्यावी तसेच कोरोना झाला असल्यास विलगीकरण सक्तीने करावे असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.