१०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस;  ...अन्यथा भविष्यात मातीदेखील नष्ट होईल; राहीबाई पोपेरे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2023 06:27 PM2023-01-05T18:27:42+5:302023-01-05T18:28:27+5:30

Nagpur News औषधांच्या वापरामुळे रानभाज्या नष्ट झाल्या. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मातीदेखील नष्ट होईल, असा इशारा सीड मदत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी येथे दिला.

108th Indian Science Congress; ...otherwise the soil will also perish in the future; Warning by Rahibai Popere | १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस;  ...अन्यथा भविष्यात मातीदेखील नष्ट होईल; राहीबाई पोपेरे यांचा इशारा

१०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस;  ...अन्यथा भविष्यात मातीदेखील नष्ट होईल; राहीबाई पोपेरे यांचा इशारा

googlenewsNext
ठळक मुद्देफार्मर सायन्स काँग्रेसचे उद्घाटन

नागपूर : रासायनिक खते, औषधांच्या अति वापरामुळे शेती नष्ट होत आहे. रासायनिक खते, औषधांच्या वापरामुळे रानभाज्या नष्ट झाल्या. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मातीदेखील नष्ट होईल, असा इशारा सीड मदत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी येथे दिला. या रासायनिक खतांमुळे विषयुक्त शेती होत आहे. आज आपल्या काळ्या मातीला (शेती) वाचवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी विषमुक्त शेती पिकविण्याची गरज आहे. तेव्हा विषमुक्त शेती पिकवा आणि माती वाचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इंडियन सायन्स काँग्रेसनिमित्त फार्मर सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना अध्यक्षस्थानी होत्या. भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बसंत कुमार दास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डॉ. एस. रामकृष्णन, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, संयोजक डॉ. प्रकाश ईटनकर उपस्थित होते.

राहीबाई पोपेरे म्हणाल्या, सुरुवातीच्या काळात माझ्या कामावर टीका व्हायची, लोक हसायचे. आज ३,५०० महिलांना सोबत घेऊन २०० गावांमध्ये काम सुरू आहे. आपण पैसे देऊन विष खरेदी करतो आणि खातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी देशी बियाण्यांचा वापर व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढले पाहिजे. प्रत्येकाच्या शेतात देशी बियाणे वापरले गेले पाहिजे, गावात विषमुक्त भाजीपाला विकला गेला पाहिजे, तरच पुढची युवापिढी सशक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राहीबाई पोपेरे यांचा सत्कार

बीज माता म्हणून देशभर ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा इंडियन सायन्स काँग्रेसच्या वतीने अध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

Web Title: 108th Indian Science Congress; ...otherwise the soil will also perish in the future; Warning by Rahibai Popere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.