कोविड रुग्णांसाठी मध्य रेल्वेचे ११ कोच सज्ज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:09 AM2021-04-30T04:09:21+5:302021-04-30T04:09:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपुरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेचे नागपूर मंडल मदत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, मध्य रेल्वेचे नागपूर मंडल मदत करायला समोर आले आहे. मध्य रेल्वने अजनीच्या कंटेनर डेपोमध्ये ११ कोचची रॅक तयार करण्यात आली आहे. महापालिका आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून १७६ बेडवर कोविड रुग्णांचा उपचार करणार आहे.
बुधवारी महापौर दयाशंकर तिवारी, मध्य रेल्वेच्या नागपूर मंडलचे मंडल रेल प्रबंधक रिचा खरे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, अतिरिक्त मंडल रेल प्रबंधक जय सिंग, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी कोचेसमध्ये व्यवस्थेची पाहणी केली.
मनपातर्फे डॉक्टर्स, नर्सेस, ऑक्सिजन, औषधी व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. महापौरांनी सर्व व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वेच्या कोचेसचा रुग्णांसाठी वापर करण्याची सूचना मनपा प्रशासनाला केली. मध्य रेल्वेकडून ११ कोचेस रुग्णासाठी व १ कोच डॉक्टर व स्टाफसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. येथे कूलर व २२ ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली आहे. रेल्वेकडून कोचेस तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.