११ लाख ५७ हजार कॅन्सर रुग्णांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:15 AM2019-02-01T01:15:11+5:302019-02-01T01:17:02+5:30

प्रगत देशाच्या तुलनेत भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या कमी आहे, परंतु मृत्यूचा दर मोठा आहे. कारण आपल्याकडे उपचारासाठी येणारे ६६ टक्के रुग्ण हे कॅन्सरच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात. भारतात गेल्या वर्षी ११ लाख ५७ हजार कॅन्सरचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात स्तनाच्या कॅन्सरचे १ लाख ६२ हजार तर ओरल कॅन्सर म्हणजे मुखाच्या कर्करोगाचे १ लाख २२ हजार रुग्णांची नोंद झाली आहे, ही माहिती राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुब्रजीत दासगुप्ता यांनी दिली.

11 lakh 57 thousand cancer patients registered | ११ लाख ५७ हजार कॅन्सर रुग्णांची नोंद

११ लाख ५७ हजार कॅन्सर रुग्णांची नोंद

Next
ठळक मुद्देसत्यजित दासगुप्ता यांची माहिती : सोमवारी रॅलीतून करणार कर्करोगाची जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रगत देशाच्या तुलनेत भारतात कॅन्सर रुग्णांची संख्या कमी आहे, परंतु मृत्यूचा दर मोठा आहे. कारण आपल्याकडे उपचारासाठी येणारे ६६ टक्के रुग्ण हे कॅन्सरच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात उपचारासाठी येतात. भारतात गेल्या वर्षी ११ लाख ५७ हजार कॅन्सरचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यात स्तनाच्या कॅन्सरचे १ लाख ६२ हजार तर ओरल कॅन्सर म्हणजे मुखाच्या कर्करोगाचे १ लाख २२ हजार रुग्णांची नोंद झाली आहे, ही माहिती राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. सुब्रजीत दासगुप्ता यांनी दिली.
४ फेब्रुवारी हा दिवस ‘कॅन्सर डे’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्त आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी रामकृष्ण छागानी, डॉ. आर. रणदिवे, डॉ. प्रशांत ढोक व डॉ. राहुल ठाकरे उपस्थित होते.
डॉ. दासगुप्ता म्हणाले, ग्लोबल कॅन्सर आकडेवारीनुसार (ग्लोबोकॅन) २०१८ मध्ये जगात १८.१ दशलक्ष नवीन कॅन्सरचे रुग्ण आढळून आले. यातील ९.६६ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जगात फुफ्फुसाचा कर्करोग हा नंबर एकवर आहे. याची टक्केवारी ११.६ एवढी आहे. यात मृत्यूचे प्रमाण १८.४ टक्के एवढे आहे. याच्या पाठोपाठ स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण ११.६ टक्के, प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण ७.१ टक्के, कोलोरेक्टर कर्करोगाचे प्रमाण ६.१ टक्के, पोटाच्या कर्करोगाचे प्रमाण ८.२ टक्के तर यृकताच्या कर्करोगाचे प्रमाण हे ८.२ टक्के एवढे आहे.
भारतात दरवर्षी सात लाख रुग्णांचा मृत्यू
डॉ. दासगुप्ता म्हणाले, कर्करोगाच्या प्रमाणामध्ये भारतात मागील काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे. सध्या ३८ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. यात दरवर्षी १४.५ लाख नवीन रुग्णांचा समावेश होत आहे. कर्करोगामुळे दरवर्षी सहा ते सात लाख रुग्णांचा मृत्यू होतो. ‘नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री’च्या आकडेवारीनुसार ३३ टक्के रुग्ण हे कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात उपचारासाठी आले तर ६६ टक्के रुग्ण हे कर्करोगाच्या ‘अ‍ॅडव्हान्स स्टेज’ म्हणजे दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आले आहेत.
पुरुषांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण १६ टक्के
आपल्या देशात पुरुषांमध्ये मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण १६ टक्के एवढे आहे तर फुफ्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण ९ टक्के आहे. तर महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण २७.७ टक्के तर गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण हे २२ टक्के आहे, अशी माहितीही डॉ. दासगुप्ता यांनी दिली.
रॅलीने वेधणार लक्ष
डॉ. बी. के. शर्मा म्हणाले, जागतिक कॅन्सर दिनाच्यानिमित्ताने ४ फेब्रवारी रोजी संस्थेकडून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध शाळा-महाविद्यालये, संस्था सहभागी होणार आहेत. सकाळी ८.३० वाजता ही रॅली ‘आरएसटी’ मधून निघेल.

 

Web Title: 11 lakh 57 thousand cancer patients registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.