भाजपाचा आणखी ११ बंडखोरांना ‘दे धक्का’
By admin | Published: February 11, 2017 02:21 AM2017-02-11T02:21:27+5:302017-02-11T02:21:27+5:30
नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी भाजपाने चांगलीच गंभीरतेने घेतली आहे.
आतापर्यंत ६५ जणांची गच्छंती
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांत पक्षाच्या कार्यकर्त्यांची बंडखोरी भाजपाने चांगलीच गंभीरतेने घेतली आहे. गुरुवारी ५४ जणांना नारळ दिल्यानंतर शुक्रवारीदेखील ११ बंडखोरांवर कारवाई करीत सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. आतापर्यंत पक्षाने ६५ जणांना बाहेरचा रस्ता दाखविला आहे. विशेष म्हणजे पक्षविरोधात भूमिका घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी सूचनाच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शहर पदाधिकाऱ्यांना केली आहे.
शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करीत निवडणुकांचा अर्ज दाखल केला. कुणी शिवसेना, बसपा यासारख्या पक्षाची कास धरली तर अनेकांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपाला आव्हान दिले. पक्ष कार्यकारिणीने ही एकूण बाबच गंभीरतेने घेतली. शुक्रवारी आणखी ११ पदाधिकारी-कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली, अशी माहिती
यांच्यावर झाली निलंबनाची कारवाई
नगरसेविका मीना तिडके, जगदीश कोहळे, माणिक तेलोते, आशीष जगनित, राकेश तिवारी, अशोक डोर्लीकर, जयश्री ढाले, विरेंद्र पासवान, संजय बुरेवार, राजू मसराम, रितिका शिवहरे.