बिबट्याच्या कातडीसह ११ नखे जप्त, तीन आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 11:05 AM2023-01-19T11:05:18+5:302023-01-19T11:06:01+5:30

नागपूर आणि वडसा वन विभागाची संयुक्त कारवाई

11 nails seized along with leopard skin, three accused arrested | बिबट्याच्या कातडीसह ११ नखे जप्त, तीन आरोपींना अटक

बिबट्याच्या कातडीसह ११ नखे जप्त, तीन आरोपींना अटक

Next

नागपृूर : बिबट्याची शिकार करून त्याचे चामडे आणि अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना नागपूर आणि वडसा देसाईगंज वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून चामडे, नखे आणि अन्य साहित्य जप्त केले आहे.

विनायक मनिरम टेकाम, मोरेश्वर वासुदेव बोरकर आणि मंगलसिंग शेरकु मडावी (सर्व रामगड, ता. कुरखेडा जि. गडचिरोली), अशी आरोपींची नावे आहेत. बिबट्याची शिकार करून त्याचे अवयव वेगवेगळे करून तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यावरून नागपूर वनविभाग आणि वडसा वनविभागाचे संयुक्त पथक तयार करून सापळा रचण्यात आला होता. यासाठी एक बनावट ग्राहक तयार करून मागील तीन दिवसांपासून त्याला तस्करांच्या संपर्कात ठेवण्यात आले होते. तस्करांची अधिक माहिती व आरोपीचे मोबाइलचे लोकेशन वडसा वनविभागाच्या पथकाला पाठविण्यात आले. त्यानंतर बनावट ग्राहकाच्या माध्यमातून १६ जानेवारीच्या सायंकाळी सौदा ठरविण्यात आला. सापळा रचून तीन आरोपींना बिबट्याचे चामडे आणि ११ नखांसह ताब्यात घेण्यात आले.

या आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम-१९७२च्या विविध कलमांद्वारे वनगुन्हे नोदविण्यात आले. बुधवारी दुपारी कुरखेडा येथील प्रथम न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर आरोपींना उपस्थित करण्यात आले. गडचिरोलीचे वनसंरक्षकडॉ. किशोर मानकर, नागपूरचे उपवसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, वडसाचे उपवसंरक्षक धर्मवार सालविठ्ठल, यांच्या मार्गदर्शनासाखली विभागीय वनअधिकारी (दक्षता), नागपूर वनवृत्तचे पी. जी. कोडापे, सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे, बि. एच. दिघोळे, क्षेत्र सहायक काकलवार, वनरक्षक तवले, पडवळ, जाधव, शेंडे यांनी ही कारवाई केली.

Web Title: 11 nails seized along with leopard skin, three accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.