११ रेल्वेगाड्या लेट; प्रवाशांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:53 AM2019-05-21T10:53:56+5:302019-05-21T10:54:27+5:30
रेल्वेच्या विविध विभागात सुरू असलेल्या विकासकामांमुळे सोमवारी ११ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वेच्या विविध विभागात सुरू असलेल्या विकासकामांमुळे सोमवारी ११ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. प्रवाशांना ताटकळत रेल्वेगाड्यांची वाट पाहत बसावे लागले. यामुळे रेल्वेस्थानकावरील वेटींग रुम फुल्ल झाल्या होत्या.
सोमवारी उशिराने येणाऱ्या रेल्वेगाड्यात १२२८६ निजामुद्दीन-सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेस ८ तास, ०७००६ रक्सोल-हैदराबाद स्पेशल १५ तास, १२८१० हावडा-छत्रपती शिवाजी टर्मिनस मुंबई १.४० तास, १५१२० मंडुआदिह-रामेश्वरम एक्स्प्रेस २.१५ तास, १२१३० हावडा-पुणे आझादहिंद एक्स्प्रेस १.५५ तास, १२१०२ हावडा-लोकमान्य टिळक टर्मिनस ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस १.४५ तास, १२६४९ यशवंतपूर-हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेस १.३० तास, १२९५० संत्रागाछी-पोरबंदर एक्स्प्रेस २ तास, १२२९६ दानापूर-बंगळुर संघमित्रा एक्स्प्रेस १.४५ तास, १२८३४ हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस ४.३० तास, १२६४७ कोईंबतुर-हजरत निजामुद्दीन १.३० तास या गाड्यांचा समावेश आहे. तर १२८०३ विशाखापट्टनम-हजरत निजामुद्दीन स्वर्णजयंती एक्स्प्रेस आणि २१ मे रोजी वर्धा-बल्लारशा पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे. उशिराने येणाºया रेल्वेगाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय झाली. अनेक प्रवासी उशिरा येणाºया गाड्यांची माहिती घेण्यासाठी उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयात चकरा मारताना दिसले.