महाराष्ट्राच्या 'या' लेकीने प्रस्थापित केला नवा विक्रम, आइनस्टाइनलाही टाकले मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 01:00 PM2021-11-10T13:00:17+5:302021-11-10T13:26:52+5:30

प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांचा आयक्यू १६० होता. मात्र, ११ वर्षीय रुचा चांदोरकरने मेन्सा टेस्टमध्ये १६२ स्कोर मिळवत आइनस्टाइनलाही मागे टाकले आहे. यासह ती जगभरातील सर्वात बुद्धीमान लोकांच्या श्रेणीत जाऊन पोहोचली आहे. 

11 year old rupa chandorkar beats Einstein's score in IQ on mensa test | महाराष्ट्राच्या 'या' लेकीने प्रस्थापित केला नवा विक्रम, आइनस्टाइनलाही टाकले मागे

महाराष्ट्राच्या 'या' लेकीने प्रस्थापित केला नवा विक्रम, आइनस्टाइनलाही टाकले मागे

googlenewsNext

नागपूर : नागपुरच्या रुचा चांदोरकरने(Rucha Chandorkar) प्रसिद्ध मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये (Mensa IQ Exam) जगभरातील बुद्धिमान लोकांना मागे सारत सर्वात जास्त आयक्यू स्कोर प्राप्त केला आहे. हा विक्रम स्थापित करत रुचाने प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांनाही मागे टाकले आहे. विशेष म्हणाजे अवघ्या ११ व्या वर्षी तिने हा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. 

सापेक्षतावादाच्या सिद्धांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांचा आयक्यू १६० होता. मात्र, नागपुरच्या रुचा चांदोरकरने त्यांच्या आयक्यू स्कोरला मागे टाकत १६२ स्कोर मिळवले आहेत. या स्कोरसह ती जगभरातील सर्वात बुद्धीमान लोकांच्या श्रेणीत जाऊन पोहोचली आहे. 

जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी असणाऱ्या मेन्सा सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या आयक्यू टेस्टमध्ये रुचाने हा स्कोर प्राप्त केला आहे. यासह ती जगातील सर्वात जास्त आयक्यू स्कोर प्राप्त करणारी मुलगी ठरली आहे. 

रुचासह तिचा मोठा भाऊ अखिलेशदेखील अतिशय हुशार असून त्यानेही २०१६ साली या टेस्टमध्ये १६० स्कोर प्राप्त करत नामांकित बुद्धिमान लोकांच्या यादित आपले नाम समाविष्ठ केले होते. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा स्कोर होता. मात्र, रुचाने आपल्या भावालाही मागे टाकून १६२ स्कोर मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इतकेच नव्हे तर तिने आनस्टाइनलाही मागे टाकले हे विशेष. 

मेन्सा आयक्यू टेस्टमध्ये जगभरातून लोकांनी सहभाग घेतला होता. याचा निकाल सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागला. या परिक्षेत आपल्याला १३० पर्यंत मजल गाठता येईल, असे वाटत होते. मात्र, निकाल हा आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त आश्चर्यकारक होता. यात १६२ स्कोर मिळणे हे खूपच चकित करणारे होते. हा स्कोर मी प्राप्त करू शकले, याचा मला खूप आनंद आहे, रुचा म्हणाली. 

रुचाचे कुटुंब २०१९ मध्ये स्कॉटलँडमध्ये शिफ्ट झाले. तिचे वडील रुत्विक आणि आई सोनाली हे दोघेही आयटी प्रोफेशनल्स आहेत. तर, अखिलेश हा तिचा मोठा भाऊ आहे. त्याने २०१६ मध्ये मेन्साच्या टेस्टमध्ये १६० गुण मिळविले होते. तेव्हापासूनच रुचानेही त्या परिक्षेत सहभागी होण्याचे ठरवले होते.

मेन्सा काय आहे?

सन १९४६ साली ऑक्सफोर्डमध्ये ऑस्ट्रेलियाचे बॅरिस्टर रोलँड बेरिल व वैज्ञानिक आणि वकील डॉ. लांस वेयर यांनी या संगठनेची स्थापना केली. ही संगठना जगभरात पसरली असून जगातील जास्त आयक्यू असणाऱ्यांपैकी फक्त २ टक्के लोकचं या संगठनेचे सदस्य आहेत.

Web Title: 11 year old rupa chandorkar beats Einstein's score in IQ on mensa test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.