नागपुरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांकडून १.१० कोटीचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:38 AM2018-09-20T00:38:26+5:302018-09-20T00:40:29+5:30

उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असली तरी, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर थुंकणे, लघुशंका करून अस्वच्छता करणाऱ्यांची कमी नाही. महापालिकेने अशा उपद्रवीवर कारवाईचा बडगा उभारला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल तब्बल १० हजार २३३ जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी १० लाखांचा दंड वसूल केला. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.

1.10 crore fine collected from the garbage makers | नागपुरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांकडून १.१० कोटीचा दंड वसूल

नागपुरात अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांकडून १.१० कोटीचा दंड वसूल

Next
ठळक मुद्देमनपाच्या उपद्रव शोध पथकाची १० हजार लोकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असली तरी, सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर थुंकणे, लघुशंका करून अस्वच्छता करणाऱ्यांची कमी नाही. महापालिकेने अशा उपद्रवीवर कारवाईचा बडगा उभारला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल तब्बल १० हजार २३३ जणांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी १० लाखांचा दंड वसूल केला. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ही कारवाई केल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी दिली.
काही वर्षांपूर्वी स्वच्छतेच्या यादीत अग्रक्रमांकावर असलेली उपराजधानी बघण्यासाठी देशभरातील महापौर व पदाधिकारी एवढेच यायचे. देशाचा स्वच्छतेचा सन्मान या शहराने प्राप्त केला होता. मात्र गेल्या काही दिवसांत परिस्थिती बदलली आहे. स्वच्छतेत शहर माघारले आहे. १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत देशभर स्वच्छता अभियान राबविले जात आहे.
अस्वच्छता निर्माण करणाºया उपद्रवांवर कारवाईसाठी शोध पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकात काम करणारे निवृत्त सैनिक असल्याने ते कठोरतेने वागून कारवाई करीत आहेत. ११ डिसेंबर २०१७ पासून या पथकाने कारवाईस सुरुवात केली. सुमारे पंधरवडा पथकाने जनजागृती केली. त्यानंतर प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात करण्यात आली. प्रारंभी राज्य सरकारने एप्रिल २०१८ पर्यंत ५० रुपये ते २ हजारपर्यंतचा दंड ठेवला होता. मे-२०१८ पासून ही दंडाची रक्कम दुप्पट करण्यात आली. त्यानंतर परत कारवाईला वेग आला. पथकाने ११ डिसेंबर ते ३१ आॅगस्ट या कालावधीत शहरातील विविध भागात १० हजार २३३ लोकांवर कारवाई केल्याची माहिती दासरवार यांनी दिली.
रस्त्यांवर वा सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, रस्त्याच्या कडेला वा सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे, फूटपाथवर कचरा टाकणे, वस्त्यांमध्ये वा रस्त्यांवरील फूटपाथवर बांधकाम साहित्य ठेवणे अशी अस्वच्छता ठिकठिकाणी करण्यात येत होती. उपद्रव शोध पथकाने अशा उपद्रवींवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

Web Title: 1.10 crore fine collected from the garbage makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.