११२६ शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता

By Admin | Published: October 1, 2015 03:25 AM2015-10-01T03:25:43+5:302015-10-01T03:25:43+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत ११२६ शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबांच्या सदस्यांनी ११८ विविध परवानाधारक सावकरांकडून घेतलेल्या २ कोटी १ लाख ४७ हजार ११८ रुपयांच्या कर्जास

1126 Release of Farmers' Savings Loan | ११२६ शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता

११२६ शेतकऱ्यांची सावकारी कर्जातून मुक्तता

googlenewsNext

५६४ शेतकऱ्यांचा समावेश : २ कोटीवर सावकारी कर्ज माफ
नागपूर : जिल्ह्यात आतापर्यंत ११२६ शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबांच्या सदस्यांनी ११८ विविध परवानाधारक सावकरांकडून घेतलेल्या २ कोटी १ लाख ४७ हजार ११८ रुपयांच्या कर्जास शासन निर्णयाप्रमाणे कर्ज माफी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यातत कुही, उमरेड, नागपूर, पारशिवनी, काटोल आणि सावनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाला शासन निर्णयाप्रमाणे ५६४ शेतकऱ्यांच्या ५८७ प्रस्तावाची १ कोटी ३ लाख ८७ हजार ८८४ रुपयांची कर्ज माफी देण्यात आली.
यापूर्वी २ सप्टेंबर रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ३२६ शेतकऱ्यांचे ५८.२४ लाख, १६ तारखेला २३६ शेतकऱ्यांचे ३९.३८ लाखांचे कर्ज माफ करण्यात आले. आजच्या बैठकीत कुही तालुक्यातील एकूण २० सावकारांकडून २५२ शेतकऱ्यांनी घेतलेले ३८ लाख ३९ हजार ६६५ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. त्याचप्रकारे उमरेड - ११ सावकारांकडून, १३१ शेतक ऱ्यांचे ३१ लाख ९१ हजार ९२४ रुपये सावकारी कर्ज माफ, नागपूर ग्रामीण ३ सावकारांकडून २१ शेतकऱ्यांनी घेतलेले ८ लाख ५५ हजार ८५७ रुपये, पारशिवनी तालुक्यातील १० सावकारांकडून २७ शेतकऱ्यांनी घेतलेले ५ लाख ९ हजार ३४७ रुपये, काटोलमधील ११ सावकारांकडून ९७ शेतकऱ्यांनी घेतलेले १२ लाख ६३ हजार २४६ रुपये आणि सावनेर तालुक्यातील ६ सावकारांकडून ३५ शेतकऱ्यांनी घेतलेले ७ लाख १७ हजार ८४५ रुपये, अशा एकूण ६१ सावकारांकडून ५६४ शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जमाफी मंजूर करण्यात आली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक प्रतिनिधी रतनसिंह यादव, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, सहायक निबंधक टी. एन. चव्हाण उपस्थित होते.(प्रतिनिधी)

Web Title: 1126 Release of Farmers' Savings Loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.