विदर्भात १,१६५ नवे रुग्ण, ३८ मृत्यू; रुग्णसंख्या ४१,०८५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 08:47 PM2020-08-24T20:47:49+5:302020-08-24T20:49:10+5:30
विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत दरदिवसाला हजार रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी १,१६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ४१,०८५ तर मृतांची संख्या १,२५१ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांच्या संख्येत दरदिवसाला हजार रुग्णांची भर पडत आहे. सोमवारी १,१६५ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून ३८ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ४१,०८५ तर मृतांची संख्या १,२५१ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे १८ ऑगस्टपासून वाशिम जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. परंतु नागपूरसह, यवतमाळ, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर व आता बुलडाण्यातही रुग्ण वाढताना दिसून येत आहे. नागपूर जिल्ह्यात ७१५ रुग्णांची नोंद झाली, तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या २१,१५४ झाली असून मृतांची संख्या ७६२ वर गेली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, आज जेवढे रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यापेक्षा जास्त, ९७९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत १२,०३२ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी परतले. नागपूरनंतर सर्वाधिक रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आढळून आले. ९४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, दोन रुग्णांचा मृत्यूही झाला. रुग्णसंख्या २,७१४ तर मृतांची संख्या ६९ वर गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. ४७ रुग्ण पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या १,४९५ तर मृतांची संख्या १६ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ५५ रुग्णांची भर पडली. रुग्णसंख्या २,६३५ झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात ४० रुग्णांचे निदान झाले. रुग्णसंख्या ४,६१३ वर पोहचली आहे. गोंदिया जिल्ह्यात ४५ रुग्ण पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. बाधितांची संख्या १,०५९ तर मृतांची संख्या १५ झाली आहे. अकोला जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. ६९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ३,५४४ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात ३९ रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ८५९ तर मृतांची संख्या १४ झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णसंख्या ६६५ झाली आहे. या जिल्ह्यात तीन रुग्णांचा मृत्यू झाला. बळींची संख्या १९ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात २२ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णसंख्या ९१६ वर पोहचली आहे.