रेल्वेस्थानकावर १.१९ लाखाचा गांजा पकडला ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:12 AM2021-09-05T04:12:12+5:302021-09-05T04:12:12+5:30
लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई नागपूर : लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमधून १ लाख १९ ...
लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमधून १ लाख १९ हजार ४०० रुपये किमतीचा ११ किलो ९४० ग्रॅम गांजा पकडला आहे.
रेल्वे मार्गाने होणाऱ्या अमली पदार्थांची वाहतूक रोखण्यासाठी लोहमार्ग पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले आहेत. त्यानुसार गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला रेल्वेगाडी क्रमांक ०२८०५ विशाखापट्टणम-नवी दिल्ली एक्स्प्रेसमधून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, रवींद्र सावजी, चंद्रशेखर मदनकर, गिरीश राऊत, श्रीकांत धोटे, विनोद खोब्रागडे, अविन गजबे, विजय मसराम यांनी ही गाडी दुपारी २.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आली असताना कोच क्रमांक बी ५ व बी ६ च्या कपलिंगमध्ये असलेली बेवारस बॅग खाली उतरविली. बॅगची तपासणी केली असता त्यात १ लाख १९ हजार ४०० रुपये किमतीचा ११ किलो ९४० ग्रॅम गांजा आढळला. उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी कागदोपत्री कारवाई करून हा गांजा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केला आहे.
............