ग्वालबन्सी विरुद्ध ११ वा गुन्हा दाखल
By admin | Published: May 4, 2017 02:18 AM2017-05-04T02:18:51+5:302017-05-04T02:18:51+5:30
भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ११ वा गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर : भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध पोलिसांनी ११ वा गुन्हा दाखल केला आहे.
बुधवारी आपल्या जमिनीचा ताबा घेत असलेल्या सचिन सोसायटीच्या प्लॉटधारकांचा ग्वालबन्सी परिवारातील महिला सदस्यांशी वाद झाला. काही काळानंतर येथे तणाव निर्माण झाला. ही घटना झिंगाबाई टाकळी येथील आहे. यातील आरोपी दिलीप ग्वालबन्सी, पप्पू यादव, जॉन अन्थोनी आणि त्यांचे सात ते आठ साथीदार आहेत. सैफुल्ला सय्यदची झिंगाबाई टाकळीत जमीन आहे. या जमिनीवर आरोपींनी ताबा मिळविला. सय्यद आणि इतर प्लॉटधारक जेंव्हा जमिनीवर जायचे तेंव्हा आरोपी त्यांना रोखायचे. आरोपींनी त्यांना तीन-तीन लाख द्या अन्यथा जमीन सोडून द्या अशी धमकी देणे सुरू केले होते. बऱ्याच कालावधीपासून हा वाद सुरू होता. सय्यदने कोराडी ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या आधारे पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.
आता ग्वालबन्सी विरुद्ध ११ गुन्हे दाखल झाले आहेत. याच दरम्यान दाभाच्या सचिन सोसायटीचे प्लॉटधारक आज सकाळी जमिनीचा ताबा घेण्यासाठी गेले. याची माहिती मिळताच ग्वालबन्सी परिवारातील महिला तेथे पोहोचल्या. त्यांनी प्लॉटधारकांना जमीन आमच्या मालकीची असल्याचे सांगितले. त्यांनी प्लॉटधारकांना ताबा घेण्यास मनाई केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिलांनी सदरचे सहायक पोलीस आयुक्त सोमनाथ वाघचौरे यांची भेट घेतली. (प्रतिनिधी)