मेट्रोच्या कामगारांना दुपारी १२ ते ४ विश्रांती : उष्णतेची लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:24 AM2019-05-01T01:24:12+5:302019-05-01T01:24:51+5:30

जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट व शहरात वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम बघता महामेट्रो नागपूरतर्फे ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजवणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना दुपारी १२ ते ४ दरम्यान कामगारांकडून काम करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

12 to 4 relaxation for the workers of the metro: heat wave | मेट्रोच्या कामगारांना दुपारी १२ ते ४ विश्रांती : उष्णतेची लाट

मेट्रोच्या कामगारांना दुपारी १२ ते ४ विश्रांती : उष्णतेची लाट

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी आजपासून

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात सर्वत्र उष्णतेची लाट व शहरात वाढत्या तापमानामुळे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम बघता महामेट्रो नागपूरतर्फे ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजवणी करण्यात येणार आहे. याअंतर्गत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या सर्व कंत्राटदारांना दुपारी १२ ते ४ दरम्यान कामगारांकडून काम करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
हिट अ‍ॅक्शन प्लॅन १ ते ३१ मेपर्यंत
१ ते ३१ मेपर्यंत ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मे महिन्यात पारा ४५ अंश सेल्सियसवर असतो. वाढत्या पाऱ्यामुळे अंगाची काहिली तर होतेच पण यामुळे उष्माघाताची शक्यता असते. शहरात मेट्रोचे कार्य सर्वत्र सुरू असून उन्हात काम करणाºया कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने नागपूर मेट्रोने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’च्या अंमलबजवणीचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनच्या नियमावलीप्रमाणे उन्हात होणारी सर्व कामे दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान करू नये, अशी स्पष्ट सूचना महामेट्रो प्रशासनाने कंत्राटदारांना दिल्या आहेत.
प्रकल्पाच्या कामावर परिणाम नाही
कामगारांची सोय बघता हा प्लॅन राबविला जात असला तरीही यामुळे प्रकल्पाच्या कामावर फरक पडणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी कामाच्या वेळापत्रकात बदल करून सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ या वेळेत कार्य पूर्ण केले जाईल. अशाप्रकारे कामाच्या वेळेचे नियोजन व बदल केल्याने प्रकल्पाची गती कायम राहीलच, शिवाय कर्मचाऱ्यांना उन्हापासून विश्रांती मिळणार आहे. एकीकडे कामाच्या वेळात बदल होत असतानाच दुसरीकडे मेट्रोच्या कार्यस्थळी कर्मचाºयांच्या सुरक्षतेकरिता विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. याअंतर्गत कार्यस्थळी सावलीकरिता शेड लावण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्याची सोय
पिण्याच्या पाण्याच्या सोईसह विविध पेयांच्या माध्यमाने शरीराचे संतुलन बिघडणार नाही याचीही दक्षता घेतली जात आहे. व ट्राफिक मार्शलकरिता चौकाचौकात कापडी छत्र्या लावण्यात आल्या आहेत. उन्हापासून स्वत:चे रक्षण करण्याकरता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासंबंधी मॉकड्रिलचे आयोजन करण्यात येत आहे तसेच उष्माघाताचा त्रास झाल्यास करण्याच्या उपाययोजनांची माहिती मॉकड्रिलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे.

Web Title: 12 to 4 relaxation for the workers of the metro: heat wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.