जनावरांच्याही कानावर १२ डिजिट नंबरचा टॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 12:28 AM2017-09-26T00:28:24+5:302017-09-26T00:29:00+5:30

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे.

12 digit number tag on animals' ears | जनावरांच्याही कानावर १२ डिजिट नंबरचा टॅग

जनावरांच्याही कानावर १२ डिजिट नंबरचा टॅग

Next
ठळक मुद्दे१ जुलैपासून सुरू झाली मोहिमेला सुरुवात : सरकारला मिळणार देशभरातील जनावरांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. याच धर्तीवर आता केंद्र सरकारने जनावरांनासुद्धा आधारशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या फक्त दुधाळ जनावरांचा समावेश आहे. १ जुलैपासून नागपूर जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे. नोंद झालेल्या गाई आणि म्हशीला १२ डिजिट नंबरचा टॅग कानाला टोचला जात आहे.
राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी, नष्ट होत असलेल्या देशी ब्रीडचे संगोपन करण्यासाठी, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांना मिळवून देण्यासाठी जनावरांना आधारशी जोडल्या जात आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मिशन फॉर बोव्हाईन प्रोडक्टीव्हीटी मोहिमेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आजपर्यंत जनगणनेसारखी पशुगणनाही होत होती. परंतु पशुगणनेत त्या पशूची पुरेशी माहिती उपलब्ध होत नव्हती. २०१२ च्या पशुगणनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १० हजार दुधाळ जनावरांची नोंद आहे. केंद्र सरकारने प्रत्येक पशूला आधार क्रमांकाच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख देण्याचा कार्यक्रम राबविला आहे. नागपूर जिल्ह्यात १ जुलैपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात १७६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. दवाखान्यातील डॉक्टर व पर्यवेक्षकाच्या माध्यमातून पशूची नोंदणी करण्यात येत आहे. पशूंना १२ डिजिटचा आधार नंबर देताना इत्थंभूत माहिती जसे, पशूचा जन्म, वय, प्रजननाचा अवधी व संगोपन करणाºया शेतकºयाचे नाव आदी माहिती नोंदविण्यात येत आहे. ही माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये डाऊनलोड करण्यात येत आहे.
आधारचे फायदे
आधार नोंदणीमुळे जनावरांचे ब्रीडिंग, न्यूट्रीशन, आरोग्य याची इत्थंभूत माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळणार आहे. त्याचबरोबर जनावरांचे लसीकरण, जनावरांची आॅनलाईन विक्री, जनावरांची संख्या, विभागातर्फे पशूंसाठी राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी, हरविलेल्या जनावरांची सहज ओळख पटणार आहे. गोरक्षणाचा भार व कोंडवाड्याचा खर्च कमी होणार आहे.

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. भविष्यात याचा लाभ होणार आहे. सध्या दुधाळ जनावरांना आधार क्रमांक देण्यात येत आहे. पशूच्या संदर्भातील अख्खी शासकीय यंत्रणा यात जोडली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ६०० जनावरांना आधार क्रमांक दिला गेला आहे.
डॉ. राजेंद्र रेवतकर,
पशुधन विकास अधिकारी

Web Title: 12 digit number tag on animals' ears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.