नागपूर जिल्ह्यात १२ सखी मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 09:42 PM2019-04-10T21:42:24+5:302019-04-10T23:10:32+5:30

लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांमध्ये जागरुकता आणण्यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने नवीन सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये विधानसभा क्षेत्रानिहाय पहिल्यांदा काही मतदान केंद्र वेगळ्या रंगात दिसणार आहे. निवडणुकीत आदर्श मतदान केंद्र (मॉडल पोलिंग बूथ) बरोबरच सखी मतदान केंद्र (ऑल वूमेन पोलिंग बूथ) बनविण्यात आले आहे.

12 Sakhi polling booth in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात १२ सखी मतदान केंद्र

नागपूर जिल्ह्यात १२ सखी मतदान केंद्र

Next
ठळक मुद्देमतदान प्रक्रियेचे संचालन करणार महिला कर्मचारी व अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांमध्ये जागरुकता आणण्यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने नवीन सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये विधानसभा क्षेत्रानिहाय पहिल्यांदा काही मतदान केंद्र वेगळ्या रंगात दिसणार आहे. निवडणुकीत आदर्श मतदान केंद्र (मॉडल पोलिंग बूथ) बरोबरच सखी मतदान केंद्र (ऑल वूमेन पोलिंग बूथ) बनविण्यात आले आहे. 


काय आहे संकल्पना 
निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकी दरम्यान नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा क्षेत्रात सखी मतदान केंद्राचे निर्माण करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर मतदानासंदर्भातील सर्व प्रक्रियेचे संचालन महिला कर्मचारी व अधिकारी करणार आहे. दिवसभर या केंद्रावर महिलाच कर्तव्य बजावणार आहे. केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांवर राहणार आहे. सखी मतदान केंद्रावर पीठासीन अधिकाऱ्यापासून प्रथम, द्वितीय, तृतीय मतदान पदाधिकारी महिलाच राहणार आहे. येथे पोलीस सुरक्षा कर्मचारीसुद्धा महिला असणार आहे. या केंद्राचा उद्देश महिला निर्भीडपणे मतदान केंद्रावर पोहचून कुठलीही भीती न बाळगता आपल्या मताच्या अधिकाराचा वापर करू शकतील.
जिल्ह्यात १२ केंद्र
लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात १२ सखी केंद्राचा निर्माण करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या अधिकारीऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, नागपूर लोकसभेत ६ व रामटेकमध्ये ६ असे एकुण १२ केंद्र महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या विशेष मतदान केंद्रावर निवडणुक ड्युटीसाठी निवडक महिला कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
येथे आहे सखी मतदान केंद्र
प्रतापनगर मराठी प्राथमिक शाळा रुम नंबर ३, महानगर पालिका दुर्गानगर मराठी प्राथमिक शाळा रुम नंबर २, केडीके कॉलेज नंदनवन रुम नंबर ४, मनपा चिंतेश्वर प्राथमिक शाळा जुनी मंगळवारी रुम नंबर १, विनियालय हायस्कूल मार्टिननगर रुम नंबर ७, मॉडर्न हायस्कूल सिव्हिल लाईन्स रुम नंबर १, श्री पंढरी कॉलेज नरखेड रुम नंबर ३, नगरपरिषद सुभाष मराठी प्राथमिक शाळा सावनेर रुम नंबर ३, जिंदल लोकांची शाळा वाडी रुम नंबर ४, पंचायत समिती कार्यालय उमरेड नगर परिषद कार्यालय कामठी, स्व. शिवाजी उराडे नगर परिषद प्राथमिक स्कूल रामटेक रूम नंबर २
पिंक बूथ म्हणता येईल 

नागपूर व रामटेक लोकसभा क्षेत्रात १२ केंद्र बनविण्यात आले आहे. या मतदान केंद्राला पिंक बूथ म्हणण्यात येत आहे. हे बूथ पिंक रंगाने सजविण्यात आले आहे. केंद्रावर पिंक रंगाचे बलून लावण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की काही केंद्रावर महिला अधिकारी पिंक रंगाच्या साड्या नेसूनसुुद्धा येणार आहे.

Web Title: 12 Sakhi polling booth in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.