४८ बँकांची १२ हजार १२९ कोटींनी फसवणूक

By admin | Published: May 15, 2015 02:47 AM2015-05-15T02:47:35+5:302015-05-15T02:47:35+5:30

देशातील ४८ बँकांची १२ हजार १२९ कोटी २१ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या बँकांसोबत फसवणुकीच्या २५५० घटना घडल्या आहेत.

12 thousand 129 crore fraud of 48 banks | ४८ बँकांची १२ हजार १२९ कोटींनी फसवणूक

४८ बँकांची १२ हजार १२९ कोटींनी फसवणूक

Next

नागपूर : देशातील ४८ बँकांची १२ हजार १२९ कोटी २१ लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली आहे. या बँकांसोबत फसवणुकीच्या २५५० घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ पर्यंतची आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून ही माहिती प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांना बँकांचे अनुत्पादित कर्ज (एनपीए) व बँकांविरुद्धच्या तक्रारीसंदर्भात धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. देशातील ९४ बँकांच्या अनुत्पादित कर्जाची रक्कम ३ लाख २ हजार ४५३ कोटी रुपये आहे. ही स्थिती ३१ डिसेंबर २०१४ पर्यंतची आहे. अनुत्पादित कर्जामध्ये स्टेट बँक आॅफ इंडिया ५९ हजार ११४ कोटींसह आघाडीवर आहे. पंजाब नॅशनल बँक २१ हजार ८३० कोटींसह दुसऱ्या, बँक आॅफ इंडिया १४ हजार ६७९ कोटींसह तिसऱ्या, बँक आॅफ बडोदा १३ हजार ३५ कोटींसह चौथ्या तर, इंडियन ओव्हरसिज बँक १२ हजार ६८१ कोटींसह पाचव्या स्थानावर आहे.
१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत बँक लोकपाल कार्यालयाला २०४ बँकांविरुद्ध एकूण ८१ हजार ८८४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. स्टेट बँक आॅफ इंडिया सर्वाधिक २० हजार ४४१ तक्रारीसह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर अनुक्रमे आयसीआयसीआय बँक (५७९५), एचडीएफसी बँक (५११६), पंजाब नॅशनल बँक (४१४१) व अ‍ॅक्सिस बँक (३६५९) यांचा क्रमांक लागतो.
बँकांचे अनुत्पादित कर्ज
अलाहाबाद बँक (७९९१), आंध्रा बँक (७११८), बँक आॅफ महाराष्ट्र (६१८७), कॅनरा बँक (१०,३६९), सेंट्रल बँक आॅफ इंडिया (११,७९३), कार्पोरेशन बँक (६९३२), देना बँक (४२३०), आयडीबीआय बँक (१२,१०९), इंडियन बँक (५१४२), ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स (७६६९), पंजाब अ‍ॅन्ड सिंध बँक (२९९६), सिंडिकेट बँक (६१६८), युको बँक (९०९६), युनियन बँक आॅफ इंडिया (१२,२३४), युनायटेड बँक आॅफ इंडिया (७८०९), विजया बँक (२३११), स्टेट बँक आॅफ बिकानेर अ‍ॅन्ड जयपूर (२९६०), स्टेट बँक आॅफ हैदराबाद (५३९३), स्टेट बँक आॅफ म्हैसूर (२५८४), स्टेट बँक आॅफ पटियाला (५४६९), स्टेट बँक आॅफ त्रावणकोर (३३६७), कॅथॉलिक बँक (५८१), सिटी युनियन बँक (३६१), धनलक्ष्मी बँक (५७५), फेडरल बँक (१०६७), आयएनजी वैश्य बँक (४१९), जम्मू अ‍ॅन्ड काश्मीर बँक (२६५८), कर्नाटक बँक (१०५४), करुर वैश्य बँक (६८०), लक्ष्मी विलास बँक (४९१), नैनिताल बँक (७६), रत्नाकर बँक (१०६), साऊथ इंडियन बँक (६६१), तामिळनाड मर्चन्टाईल बँक (३८४), अ‍ॅक्सिस बँक (३५०२), डीसीबी बँक (१७९), एचडीएफसी बँक (३२४९), आयसीआयसीआय बँक (११२९९), इंडसइंड बँक (६७३), कोटक महिंद्रा बँक (१२२०), येस बँक (२७९), बँक आॅफ नोव्हा स्कोटिया (३१६), बँक आॅफ सिलोन (१९३), सिटी बँक (१५०८), डीबीएस बँक (१७५७), हाँगकाँग अ‍ॅन्ड शांघाई बँक (५८३), मिझुहो कार्पोरेट बँक (१४८), स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक (६४७७)(सर्व आकडेवारी कोटीमध्ये).

Web Title: 12 thousand 129 crore fraud of 48 banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.