सर्पदंशामुळे १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:09 AM2021-08-01T04:09:00+5:302021-08-01T04:09:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : घरालगत असलेल्या गाेठ्यातील गुरांना चारा घालत असताना विषारी सापाने १२ वर्षीय मुलाच्या पायाला दंश ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : घरालगत असलेल्या गाेठ्यातील गुरांना चारा घालत असताना विषारी सापाने १२ वर्षीय मुलाच्या पायाला दंश केले. उपचारासाठी नागपूरला नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. ही घटना काटाेल तालुक्यातील खंडाळा (खुर्द) येथे शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली.
यश माेहन जाेगेकर (१२, रा. खंडाळा खुर्द, ता. काटाेल) असे या मुलाचे नाव आहे. यशकडे शेती व गुरे आहेत. ता. शुक्रवारी सायंकाळी गाेठ्यात बांधलेल्या जनावरांना चारा घालत हाेता. त्यातच अनावधानाने गाेठ्यात असलेला विषारी सापाने त्याच्या पायाला दंश केले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले.
तिथे प्रथमाेपचार केल्यानंतर लगेच नागपूरला रवाना करण्यात आले. वाटेत कळमेश्वरजवळ त्याची प्रकृती खालावली. त्यामुळे त्याला मध्येच कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घाेषित केले. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.
...
वडिलांचे तीन महिन्यांपूर्वी निधन
यशचे वडील माेहन जाेगेकर यांचे तीन महिन्यांपूर्वी हृदयविकाराने निधन झाले. त्यामुळे आई यश व त्याच्या भावाचा सांभाळ करायची. ताेही आईला घर व शेतीच्या कामात मदत करायचा. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातच त्याच्या आई व भावावर दु:खाचा डाेंगर काेसळला. त्यामुळे शासनाने त्याच्या कुटुंबीयाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
310721\img-20210731-wa0070.jpg
फोटो ओळी. काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात भरती असताना यश जोगेकर.