अत्याचार करणाऱ्या शिक्षकास १२ वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:41+5:302021-02-10T04:09:41+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क माैदा : इयत्ता दहावीत नापास करण्याची धमकी देत असेच लग्न करण्याचे आमिष दाखवून शिक्षकाने १७ वर्षीय ...

12 years imprisonment for abusive teacher | अत्याचार करणाऱ्या शिक्षकास १२ वर्षाचा कारावास

अत्याचार करणाऱ्या शिक्षकास १२ वर्षाचा कारावास

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

माैदा : इयत्ता दहावीत नापास करण्याची धमकी देत असेच लग्न करण्याचे आमिष दाखवून शिक्षकाने १७ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना ४ मे २०१३ राेजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास माैदा शहरात घडली हाेती. या प्रकरणात आराेप सिद्ध झाल्याने विशेष सत्र न्यायाधीश पी. एफ. सैयद यांच्या न्यायालयाने आराेपी शिक्षकास १२ वर्षाचा कारावास व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. महिंद्र दाैलतराव आंबिलडुके (४९, रा. माैदा) असे आराेपी शिक्षकाचे नाव आहे. ताे माैदा शहरातील शाळेत गणिताचा शिक्षक हाेता. शिवाय गणिताची शिकवणी घ्यायचा. पीडित विद्यार्थिनी त्याच्याकडे मार्च २०१२ ते मार्च २०१३ या काळात शिकवणी वर्गाला जायची. त्यावर्षी ती दहावीत हाेती.

महिंद्रने तिला गणितात नापास करण्याची धमकी दिली. शिवाय, लग्न करण्याची बतावणी करीत तिच्याशी वेगवेगळ्या ठिकाणी शरीरसंबंध प्रस्थापित केले. शिवाय, मानसिक त्रास देऊन तिला जीवे मारण्याची धमकही दिली. हा प्रकार असह्य झाल्याने तिने कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेत ४ मे २०१३ राेजी पाेलिसात तक्रार दाखल केली. तपास अधिकारी तथा पाेलीस निरीक्षक एम. के. तायडे यांनी भादंवि ३७६ (२) (१), ५०६ पाेक्साे सहकलम ४, ८, १० अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी महिंद्रला अटक केली आणि तपास पूर्ण करून प्रकरणी विशेष सत्र न्यायाधीश पी. एफ.सैयद यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ट केले.

न्यायालयाने साक्षपुरावे तपासत महिंद्रला दाेषी ठरवले. त्याला भादंवि ३७६ (२) (एफ), पाेक्साे सहकलम ८, १२ अन्वये १० वर्षाचा सश्रम कारावास व ३० हजार रुपयांचा दंड भादंवि ५०६ अन्वये दाेन वर्षाचा कारावास व पाच वर्षांचा दंड अशी १२ वर्षाचा कारावास व ३५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या दंडातील २५ हजार रुपये पीडितेला देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील खापर्डे यांनी बाजू मांडली असून, सहायक फाैजदार बेनिराम तालेवार, शंकरराव तराळे, वासुदेव मस्के, मनाेज तिवारी, सुनील डाेंगरे या पाेलीस कर्मचाऱ्यांनी तपास कार्यात मदत केली.

Web Title: 12 years imprisonment for abusive teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.