राज्यात १२,०४७ सायबर गुन्ह्यांची नोंद, दोषसिद्धी प्रमाण ३१ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 07:48 PM2017-12-13T19:48:51+5:302017-12-13T19:50:04+5:30

जानेवारी २०१२ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत १२,०४७ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ३,६०२ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

12,047 cyber crimes registered in the state, conviction rate 31 percent | राज्यात १२,०४७ सायबर गुन्ह्यांची नोंद, दोषसिद्धी प्रमाण ३१ टक्के

राज्यात १२,०४७ सायबर गुन्ह्यांची नोंद, दोषसिद्धी प्रमाण ३१ टक्के

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती


आॅनलाईन लोकमत
नागपूर : जानेवारी २०१२ ते आॅक्टोबर २०१७ या कालावधीत राज्यात माहिती व तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत १२,०४७ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील ३,६०२ गुन्ह्यांचा तपास करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
जानेवारी २०१२ पासून आॅक्टोबर २०१७ या कालावधीत मुंबई शहरात ४,३२२ सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यातील १८०८ गुन्हे हे के्रडिट कार्ड किंवा डेबिट कार्डसंदर्भातील आहेत. मुंबई शहरातील सायबर गुन्ह्यांचे दोषसिद्धी प्रमाण ३१ टक्के असून, राज्यातील हे प्रमाण २४ टक्के असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात दिली.
राज्यातील सर्व जिल्हे व पोलीस आयुक्तालयांमध्ये ४७ सायबर लॅब, तंत्रज्ञानयुक्त गुन्हे अन्वेषण केंद्रांना सायबर पोलीस ठाणे असे घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी तपासासाठी आवश्यक आधुनिक यंत्रसामुगी पुरविण्यात आलेली आहे. सायबर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध दोषारोप सिद्ध होण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अनंत गाडगीळ, भाई गिरकर, प्रवीण दरेकर आदींनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: 12,047 cyber crimes registered in the state, conviction rate 31 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.