नागपुरात कस्टमच्या ताब्यातील १२.४१ लाखांच्या सिगारेट लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:35 PM2018-01-25T15:35:11+5:302018-01-25T15:44:11+5:30
विमानतळावरील कस्टमच्या गोदामात ठेवलेले १२.४१ लाखांचे विदेशी सिगारेट बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. विमानतळासारखा संवेदनशिल ठिकाणी आणि कस्टम सारख्या महत्वपूर्ण तपास यंत्रणेच्या ताब्यातून चोरट्यांनी हा माल लंपास केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमानतळावरील कस्टमच्या गोदामात ठेवलेले १२.४१ लाखांचे विदेशी सिगारेट बॉक्स चोरट्यांनी लंपास केले. विमानतळासारखा संवेदनशिल ठिकाणी आणि कस्टम सारख्या महत्वपूर्ण तपास यंत्रणेच्या ताब्यातून चोरट्यांनी हा माल लंपास केल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
प्रवाशांनी वेगवेगळळ्या देशातून आणलेल्या प्रतिबंधित सिगारेट विमानतळावर कस्टम अधिकारी जप्त करतात. जप्त झालेला हा माल विमानतळावर असलेल्या कस्टमच्या गोदामात ठेवला जातो. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर अशाच प्रकारे विविध देशातून प्रवाश्यांनी आणणलेल्या सिगारेट जप्त केल्या होत्या. त्यातील २१ लाख, ४१ हजार, ७९० रुपये किंमतीच्या सिगारेटस्चे ७२० बॉक्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. १० जानेवारी २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत ही चोरीची घटना घडली. ती लक्षात आल्यानंतर संबंधित अधिका-यांनी चौकशी सुरू केली. संबंधित अनेकांचे बयाण नोंदवून घेण्यात आले. त्यानंतर अतुलप्रकाश कृष्णकुमार महाजन (वय ३५, रा. यशोदानगर) यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, चोरट्याचा शोध घेतला जात आहे.
सीसीटीव्हीची तपासणी
विमानतळासारख्या संवेदनशिल ठिकाणाहून तपास यंत्रणेच्या ताब्यातील जप्त मालाची चोरी झाल्याने संबंधित प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. गोदामात नेहमी वावर असणारांपैकी कुण्याचा या चोरीत सहभाग असावा, असा संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.